Breaking News

काँग्रेस मुख्यालयासमोर हिंदू महासभा उभारणार सावरकरांचा पुतळा

Advertisements

अखिल भारतीय हिंदू महासभेने दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयासमोर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पुतळा उभारण्याचा निर्णय घेतलाय. वीर सावरकरांवर आक्षेपार्ह मत नोंदवल्याने महासभेने कॉंग्रेस नेते राहुल गांधींवर टीका केली आहे.

Advertisements

यासंबंधी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून स्वातंत्र्यसेनानींचा अपमान करणाऱ्या कॉंग्रेस नेत्यांच्या सामाजिक तसेच राजकीय कार्यक्रमांवर बंदी घालण्याची माग‍णी केलीय.

Advertisements

कॉंग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी सातत्याने वीर सावरकरांबद्दल अपमानजनक शब्दांचा वापर करतात. राहुल गांधी मानसिक रित्या आजारी आहे. इंग्रजांच्या इशाऱ्यावर ते महान स्वातंत्र्य सेनानींचा अपमान करीत असतील तर हा एक मोठा गुन्हा आहे. त्यामुळे सरकारने राहुल गांधी यांच्या राजकीय कार्यक्रमांवर तात्काळ प्रभावाने बंदी घालत त्यांना तुरुंगात डांबले पाहिजे,असे आवाहन पत्रातून महासभेकडून करण्यात आले आहे.

26 फेब्रुवारीला कार्यक्रम

येत्या २६ फेब्रुवारीला सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त महासभेकडून २४, अकबर रोड स्थित कॉंग्रेस मुख्यालयासमोर सावरकरांचा पुतळा उभारला जाईल, असे पत्रातून महासभेने स्पष्ट केले.अकबर रोड चे नाव बदलून वीर सावकर रोड करण्याची मागणी करीत सावरकरांना भारतरत्न देण्याची विनंती पत्रातून पंतप्रधानांकडे करण्यात आलीय.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

सिवनी में ‘जंबो सीताफल’देख खुश हुए CM शिवराज सिंह चौहान

  टेकचंद्र सनोडिया शास्त्री:सह-संपादक की सिवनी। मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान ने आज सिवनी में ”एक …

सनातन धर्म विवाद पर बोलने से वोटबैंक का नुकसान? सतर्क हुई कांग्रेस

सनातन धर्म विवाद पर बोलने से वोटबैंक का नुकसान? सतर्क हुई कांग्रेस टेकचंद्र सनोडिया शास्त्री:सह-संपादक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *