ज्या घरामध्ये तुळशीचं रोप आहे, तिथे सदैव सुखसंपत्ती आणि भरभराट नांदते असं म्हटलं जातं. तुम्हाला माहितीये का? हे रोप असणं जितकं महत्त्वाचं त्याहूनही त्याची काळजी घेतली जाणं त्याहून महत्त्वाचं आहे. आपण, सहसा घरामध्ये खिडकीच्या भागात झाडं ठेवतो. तिथं तुळशीसोबत इतरही काही झाडं आपण ठेवतो. पण, या पवित्र रोपाशेजारी कोणतंही झाड किंवा रोप ठेवून चालत नाही.
तुळशीशेजारी कोणतं रोप ठेवू नये?
असं म्हणतात की तुळशीच्या शेजारी कधीच रुई लावू नये. यामुळं नकारात्मक परिणाम दिसून येतात. अनेकजण सहसा एका कुंडीतच दोन रोपंही लावतात. तर, असंही अजिबातच करु नये. कारण, सहसा काही रोपांमधून एक पांढरा द्रव्य बाहेर पडतो. हा द्रव्य जर तुळशीच्या रोपावर चुकूनही पडला तर मोठं नुकसान होतं. बरं या नुकसानातून सावरताना बराच वेळही दवडला जातो.
तुळशीच्या शेजारी कधीच निवडुंगही ठेवू नका.
निवडुंगाला असणाऱ्या काट्यांमुळे घरामध्ये नकारात्मक उर्जेचा वावर वाढतो. या रोपाला राहू-केतूचं प्रतीक मानलं जातं. ज्यामुळं ते कायमच दक्षिण पश्चिमेला ठेवावं. तर, तुळशीसाठी योग्य दिशा म्हणजे पूर्व किंवा पूर्वोत्तर. त्यामुळं कधीही ही दोन रोपं एकाच दिशेला ठेवू नये. तुळस आणि निवडुंग एकत्र ठेवल्यास तुळशीची सकारात्मकता हळुहळू संपुष्टात येते.आणि नकारात्मकता वाढून त्रास सुरु होतो.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. विश्व भारत याची पुष्टी करत नाही.)