शिव भोजन थाळीचे बील काढण्यासाठी 80 हजाराची लाच : लाचलूचपतच्या पोलीस निरीक्षकही जाळ्यात

✳️पहिली घटना

शिवभोजन थाळीचे थकीत देयक काढण्यासाठी 80 हजाराची लाच घेताना वाशिम येथील पुरवठा निरीक्षकाला अटक करण्यात आली आहे. निलेश विठ्ठल राठोड असे पुरवठा निरीक्षकाचे नाव आहे. ही कारवाई अमरावती लाचलूचपत विभागाने केली.

✳️दुसरी घटना

नांदेड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या मीना बकाल आणि त्यांचे पती कुलभूषण बावस्कर या दोघांना 60 हजारांची लाच घेताना अटक करण्यात आली. ही कारवाई औरंगाबाद युनिटने केली.

कंधार येथील एका सेतू सुविधा केंद्राच्या तक्रारीची कारवाई टाळण्यासाठी ही लाच घेण्यात आली. तक्राराच्या नातेवाईकाबद्दल या विभागाकडे चौकशी अर्ज प्रलंबित होता. ही कारवाई टाळण्यासाठी उदगीर येथील दोघेजण त्यांच्याकडे गेले आणि हे प्रकरण संपुष्टात आणतो असे म्हणून त्यांच्याकडे एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोड होऊन 70 हजार रुपये देण्याचे ठरले. मात्र तक्रारदाराला लाच द्यावयाची नसल्याने त्यांनी औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या विभागाने तक्रारीची शहानिशा केल्यानंतर 20 नोव्हेंबर रोजी सापळा लावला होता.

पहिला हप्ता म्हणून 60 हजार रुपये स्वीकारल्यानंतर सय्यद शकील, सय्यद ईस्माईल या दोघांना अटक करण्यात आली. या दोघांविरुद्ध मुखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. ही कारवाई औरंगाबादचे पोलीस उपअधीक्षक गोरखनाथ गांगुर्डे आणि पोलीस निरीक्षक रेशमा सौदागर यांच्या पथकाने केली. हे प्रकरण नांदेड जिल्ह्याच्या संबंधित असल्याने त्याचा तपास नांदेड येथील पोलीस निरीक्षक वांद्रे यांच्याकडे देण्यात आला.

पुढील तपासात येथेच कार्यरत असलेल्या महिला पोलीस निरीक्षक मीन बकाल आणि त्यांचे पती कुलभूषण बावस्कर या दोघांना अटक करण्यात आली. न्यायालयाने या दोघांनाही 30 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत देण्यात आली आहे.

About विश्व भारत

Check Also

नागपुरच्या उमरेडमध्ये तरुणीचा बलात्कार करुन खून

नागपूर जिल्ह्यातील उमरेडमध्ये एक तरुणीवर प्रियकराने बलात्कार करुन तिचा खून केला .तरुणीचा मृतदेह आढळल्यामुळे एकच …

बेरहमी से 14 वर्षीय बच्चे को उल्टा लटकाकर की पिटाई

बेरहमी से 14 वर्षीय बच्चे को उल्टा लटकाकर की पिटाई टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *