आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना जळक्‍या लाकडाने अधीक्षकाकडून मारहाण

अहमदनगरच्या अकोले तालुक्यातील शिरपुंजे शासकीय आश्रम शाळेतील ६ विद्यार्थ्यांना अधीक्षक अश्विन पाईक यांनी जळती लाकडे हातात घेऊन मारहाण केली आहे. या घटनेची तक्रार आमदार डॉ. किरण लहामटे यांनी आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्याकडे केली आहे.

अकोले तालुक्यातील शासकीय आश्रम शाळेमध्ये 3 डिसेंबर रोजी सकाळी शिरपुंजे आश्रमशाळेत मुलांनी कचरा जमा करून पेटविला होता. मात्र काही कचरा शिल्लक होता. त्यामुळे मुले पुन्हा शाळेत गेली. त्यानंतर उर्वरीत लाकडे पेटवून जाळ करण्यात आला होता. हा प्रकार तेथे आलेल्या अधिक्षक अश्विन पाईक यांना दिसला. मुले जाळाजवळ शेकत असताना पाईक आले आणि त्यांनी जळती लाकडे हातात घेऊन मुलांना मारण्यास सुरूवात केली. इयत्ता ६ वे ९ वीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलांना संबंधित व्यक्तीने जळत्या लाकडाने मारहाण केली. त्यात काही मुलांच्या पायावर, पाठीवर आणि अन्य ठिकाणी जखमा झाल्या आहेत. अशोक संतोष धादवड वय १२, ओमकार भिमा बांबळे वय १४, दत्ता सोमनाथ धादवड वय १४, युवराज भाऊ धादवड वय १५, गणेश लक्ष्मण भांगरे वय १५ या विद्यार्थ्यांना अधीक्षक यांनी मारहाण केली आहे.

हा सर्व प्रकार जेव्हा मुलांनी आपल्या पालकांना सांगितला. त्‍यानंतर पालकांनी जखमा पाहून तात्‍काळ मुलांना राजूर ग्रामीण रुग्णालय उपचारासाठी नेले. या घटनेची माहिती आमदार डॉ. किरण लहामटे यांना समजतात ते राजुर ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले. त्‍यांनी संबंधीत प्रकरणाची विद्यार्थ्यांकडून चौकशी करीत आधार दिला. तात्काळ आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी भवारी यांनी घडलेल्या प्रकाराची माहिती दिली.

अधीक्षक पाईक यांनी जळत्‍या लाकडे मारहाण केल्‍याने कारवाई करून निलंबित करावे अशी मागणी केली आहे.

About विश्व भारत

Check Also

२ सचिव दर्जाचे IAS अधिकारी निलंबित

केरळ सरकारने नुकतीच राज्यातील दोन आयएएस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली. शिस्तभंगाच्या मुद्द्यावरून ही कारवाई करण्यात …

निवडणुकीत नागपूर जिल्ह्यात कारवाई कधी? : पिंपरी-चिंचवडमध्ये ८० लाखांची रोकड जप्त

विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यापासून पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अवैधरीत्या वाहतूक करीत असलेली ७९ लाख ६६ हजाराची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *