Breaking News

महाराष्‍ट्र गुजरातला देणार वाघ : बदल्‍यात कोल्‍हा अन् इमू मिळणार

Advertisements

मागील काही महिन्यांत महाराष्ट्रातील अनेक नियोजित उद्योग गुजरात राज्यात गेल्याचा आरोप झाला. त्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले. आता औरंगाबादेतील दोन वाघही गुजरातला जात आहेत. अहमदाबादच्या कमला नेहरू प्राणिसंग्रहालयाला दोन वाघ देण्याच्या आणि त्यांच्याकडून कोल्हा, इमू यासह इतर काही प्राणी स्वीकारण्याच्या प्रस्तावाला औरंगाबाद महापालिकेने मंजुरी दिली आहे. त्यानुसार येत्या पंधरा दिवसांत प्राण्यांचे हे हस्तांतरण होणार आहे.

Advertisements

महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयात तीनशेहून अधिक प्राणी आहेत. यात सर्वाधिक १४ वाघ आहेत. बहुतेक प्राण्यांच्या जोड्या आहेत. परंतु सायाळ, स्पूनबिल पक्षी, इमू आणि कोल्हा हे प्राणी मात्र एकेकच आहेत. त्यांना जोडीदार नाहीत. त्यामुळे त्यांना जोडीदार मिळविण्यासाठी महापालिकेचे प्रशासन प्रयत्नशील होते. त्या अनुशंगाने देशभरातील विविध प्राणिसंग्रहालयांकडे पत्रव्यवहार करण्यात आला होता. गुजरात मधील अहमदाबाद येथील प्राणिसंग्रहालयाने हे प्राणी देण्याची तयारी दर्शविली होती. परंतु त्याबदल्यात त्यांनी दोन पिवळे मादी वाघ देण्याची अट टाकली होती. दोन्ही ठिकाणच्या प्राणिसंग्रहालय प्रशासनात त्याबाबत सविस्तर चर्चा झाल्यानंतर त्याबाबतचा प्रस्ताव ७ जुलै २०२२ रोजी केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाकडे पाठविण्यात आला. त्याला प्राधिकरणाने ७ जुलै ऑक्टोबर २०२२ रोजी मान्यता दिली. त्यानंतर प्राणिसंग्रहालय प्रशासनाने प्राण्यांचे प्रत्यक्ष हस्तांतरण करण्याचा प्रस्ताव मनपा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे सादर केला होता. त्याला चौधरी यांनी नुकतीच मंजुरी दिली.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

“तुम्ही सर्वांना मूर्ख बनवू शकता, पण स्वतःला नाही” : सरन्यायाधीश चंद्रचूड आणखी काय म्हणाले वकिलांना?

आपण सर्वांना मूर्ख बनवू शकतो, पण स्वतःला नाही. आपण आपली सचोटी कशी राखतो यावर आपला …

हिंदू महासभा के राष्ट्रीय अध्यक्ष मुन्ना कुमार शर्मा की मणिपूर के मैतेई हिंदू समुदाय सें बैठक

नई दिल्ली स्थित मंदिर मार्गपर अखिल भारत हिन्दू महासभा के मुख्यालय हिन्दू महासभा भवन में …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *