Breaking News

स्वच्छ सर्वेक्षणाला दांडी : 11 वरिष्ठ अधिकाऱ्यांना नोटीस

Advertisements

करोडो खर्च करून विविध शहरे स्वच्छ करण्यासाठी मोदी सरकार पुढाकार घेत आहे. मात्र, अधिकारी उदासीन असल्याचे पाहायला मिळत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षण 2023 च्या जनजागृती कार्यशाळेला आणि बैठकांना दांडी मारणार्‍या 7 उपायुक्त, 3 सहायक आयुक्त व एका क्षेत्रीय अधिकार्‍यांस पालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी कारणा दाखवा नोटीस बजावली आहे.तीन दिवसात खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यात थेट कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

Advertisements

अधिकाऱ्यांना नोटीस

Advertisements

एलबीटी विभागाच्या उपायुक्त स्मिता झगडे, उद्यान विभागाचे उपायुक्त सुभाष इंगळे, समाज विकास विभागाचे उपायुक्त चंद्रकांत इंदलकर, भांडार विभागाचे उपायुक्त मनोज लोणकर, शिक्षण विभागाचे उपायुक्त संदीप खोत, आकाश चिन्ह व परवाना विभागाचे उपायुक्त सचिन ढोले, सामन्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांच्यासह भूमी आणि जिंदगी विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत जोशी, कर संकलन विभागाचे सहायक आयुक्त नीलेश देशमुख, झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन विभागाच्या सहायक आयुक्त सुषमा शिंदे, महफ क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी विजयकुमार थोरात यांना नोटीस बजावण्यात आली आहे.

केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर राज्यामध्ये स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविण्यात येत आहे. त्यानुसार आयुक्त सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ह्युुमन मेट्रीक्स सिक्युरिटीने स्वच्छ सर्वेक्षण 2023 जनजागृती कार्यशाळेचे 29 नोव्हेंबरला सकाळी 9 ते 2 या वेळेत चिंचवड येथील ऑटो क्लस्टार हॉलमध्ये आयोजन केले होते. या कार्यशाळेला सर्व विभागाच्या विभागप्रमुखांनी उपस्थित राहण्याबाबत स्वच्छ महाराष्ट्र अंमलबजावणी कक्षाने 28 नोव्हेंबरला आदेश दिला होता. त्यामुळे या कार्यशाळेला उपायुक्त, सहाय्यक आयुक्तांनी उपस्थित रहाणे बंधनकारक होते.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

भूगर्भ ‘ब्लास्टिंग’ विस्फोट और पेयजल के अभाव में वन्यप्राणियों के विनाश का खतरा

भूगर्भ ‘ब्लास्टिंग’ विस्फोट और पेयजल के अभाव में वन्यप्राणियों के विनाश का खतरा   टेकचंद्र …

उष्णतेने नागपूर बेजार : कोकण वगळता राज्यातील सर्व भागांना फटका

अवकाळीचं सावट अधूनमधून डोकावत असतानाच राज्यात उकाडा प्रचंड वाढत आहे. राज्याच्या काही भागांमध्ये तापमानाचा आकडा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *