✍️मोहन कारेमोरे
‘पीडब्लूडी’चे घर शासकीय कर्मचाऱ्यांना न देता किरायाने दिल्याची बातमी ‘विश्व भारत’ न्यूज पोर्टलवर प्रकाशित झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. आता यात आणखी विश्व्सनीय माहिती मिळाली असून किरायाची घरे जवळपास 70 असल्याचे कळते. त्यामुळे यात पीडब्लूडी खात्यातील बढे अधिकारी संशयाच्या भवऱ्यात सापडले आहेत.
ऐन हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर नागपुरात शासनाचा महसूल बुढविणारा प्रकार समोर आलाय. शासकीय निवास सरकारी कर्मचाऱ्यांना न देता खासगी लोकांना दिल्याचे उघड झाले आहे.
प्रकरण काय आहे?
नागपुरातील पीडब्लूडीच्या विभाग क्रमांक एकच्या अंतर्गत रविनगर शासकीय रहिवासी वसाहत आहे. तिथे शासकीय निवासी घरे फक्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध असतात. परंतु, मागील 3 वर्षांपासून 80 हून अधिक घरे बाहेरील खासगी लोकांना बेकायदेशीररित्या देण्यात येत आहेत. तसेच अंदाजे 15 हजार किराया देखील घेण्यात येत आहे. हे काम उपअभियंता यांच्या निर्देशानुसार करण्यात आल्याचे समजते. शासनाची फसवणूक करणाऱ्या उपअभियंत्यावर तातडीने कारवाई करावी,अशी मागणी आहे. याकडे लक्ष न दिल्यास लवकरच जनहित याचिका दाखल करू, असा इशारा देण्यात आला आहे.