Breaking News

खंडणी मागणारा नागपूर मनसेचा जिल्हाध्यक्ष अटकेत

एका दुकानदाराला दोन लाखांची खंडणी मागणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जिल्हाध्यक्ष आदित्य दुरुगकरला गावकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.

ही घटना उमरेड तालुक्यातील कुही येथे घडली. दुरुगकर हा चार-पाच कार्यकर्त्यांना घेऊन कुही गावात गेला. आम्ही अन्न व प्रशासन विभागाचे (एफडीए) अधिकारी आहोत, असे सांगून एका दुकानाची झाडाझडती घेतली. दुकानात सुगंधी तंबाखू आढळल्याचे सांगून दोन लाखांची खंडणी मागितली. दुकानदाराला खरंच अधिकारी असल्याचे समजले. ३० हजार रुपये देण्याची त्याने तयारी दर्शवली. दुकानात धाड पडल्याने गावकरीसुद्धा येथे गोळा झाले होते. या दरम्यान दुकानात नेहमी येणारा डेली कलेक्शन करणारा एक व्यक्ती आला. त्याने अधिकारी असल्याचा पुरावा मागितला. आपले बिंग फुटत असल्याचे बघून दुरुगकर सोबत असलेले कार्यकर्ते पळून गेले. मात्र दुरुगकर गावकऱ्यांच्या तावडीत सापडला. त्यांनी दुरुकरला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. यामुळे मनसेमध्ये एकच खळबळ उडाली. बदनामी टाळण्यासाठी काही प्रदेशच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीने हालचाली करून प्रकरण दडवण्याचे प्रयत्न केले. एक बडा पदाधिकारी पोलिस उप अधीक्षकाच्या संपर्कात असून गुन्हा दाखल होऊ नये याकरिता दबाव टाकत आहे. दुरुगकर याच्यावर यापूर्वीसुद्धा खंडणी मागण्याचे आरोप आहेत. अलीकडेच मनसेच प्रमुख राज ठाकरे यांनी नागपूर जिल्हा (ग्रामीण) दुरुगकर यास बढती देऊन जिल्हाध्यक्ष केले आहे.

About विश्व भारत

Check Also

सैकडों महिलाओं का सुहाग उजाडने वाला दाऊद इब्राहिम पाकिस्तान में!

सैकडों महिलाओं का सुहाग उजाडने वाला दाऊद इब्राहिम पाकिस्तान में! टेकचंद्र सनोडिया शास्त्रा: सह-संपादक रिपोर्ट …

जमीन जायदाद के विवाद में किसान की मौत

जमीन जायदाद के विवाद में किसान की मौत टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   छिंदवाड़ा।09.05.2025 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *