Breaking News

मृद व जलसंधारण विभागात 670 पदांसाठी भरती, मार्चमध्ये परीक्षा

मृद व जलसंधारण विभागात ‘गट ब’ (अराजपत्रित) संवर्गातील ६७० पदांची सरळसेवेने भरती करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. डिसेंबरमध्ये भरती प्रक्रियेची कार्यवाही सुरू होईल. ३१ डिसेंबरपूर्वी सविस्तर जाहिरात प्रसिद्ध होणार असून मार्च २०२३ मध्ये परीक्षा होईल.

या भरती प्रक्रियेसाठीच्या निवड समितीला ३१ डिसेंबरपूर्वी जाहिरात प्रसिद्ध करावी लागणार आहे. उमेदवारांचे अर्ज मागविणे, परीक्षेचे ओळखपत्र पाठविण्याची प्रक्रिया ३१ जानेवारीपर्यंत होईल. परीक्षेचा कालावधी १५ मार्च ते ३० एप्रिल असेल. निकाल व त्यानुसार निवड सूची १५ ते ३१ मे २०२३ पर्यंत होईल. तर निवडलेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश १ जून २०२३ पूर्वी द्यावे लागतील. ही भरती प्रक्रिया राबविण्यासाठी राज्य शासनाने सात सदस्यीय समिती स्थापली आहे. या समितीत नाशिकच्या जिल्हा जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गिते यांचा समावेश आहे. समितीच्या अध्यक्षपदी औरंगाबादच्या मृद व जलसंधारण वाल्मीचे आयुक्त मधुकर अर्दंड तर सदस्यपदी पुण्याचे या विभागाचे अपर आयुक्त सु. पां. कुशिरे आहे.

About विश्व भारत

Check Also

जिल्हा अंतर्गत बदल्या अडकल्या

शिक्षकांच्या जिल्हा बदली प्रक्रियेला २४ एप्रिल पासून सुरुवात झाल्यानंतर बदली पात्र गुरुजींनी सुटकेचा श्वास सोडला …

शेतकऱ्यांची लूट! जिल्हाधिकाऱ्यांची थेट धडक

खरीप हंगामासाठी जिल्ह्यात कृषी निविष्ठांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्याबरोबरच विक्री व्यवहारात पारदर्शकता ठेवण्याचे प्रशासनापुढे आव्हान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *