जुन्या जळगावातील झाशीची राणी पुतळा ते काेल्हे शाळा, नेरीनाका स्मशानभूमीमागील रस्त्याची प्रचंड दुर्दशा झाली आहे. नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागताेय.
रस्ते वर्ग झाल्यानंतरही बांधकाम विभाग कामे करीत नसल्याने संतप्त नागरिकांनी माेर्चा काढला. परिसरातील रस्त्यांवरील खड्ड्यांचे फाेटाे असलेली फ्रेम अधीक्षक अभियंता कार्यालयाला भेट देऊन निषेध केला आहे.
रस्ते काम रखडले
रस्त्यांची कामे गेल्या २० वर्षात झालेली नाहीत. श्रीकृष्णनगर, झिपरूअण्णा नगर, नेरीनाका परिसर, जुने जळगावातील नागरिकांना खड्डेमय रस्त्यातून प्रवास करावा लागताे. प्रचंड वर्दळ असतानाही या रस्त्यांच्या कामांकडे दुर्लक्ष केले जाते. यामुळे प्रदूषण वाढले असून धुळीचा त्रास सहन करावा लागताे आहे. या रस्त्यांचे निरीक्षण करून माेजमाप बांधकाम विभागाने केले आहे; परंतु रस्त्यांची कामे हाती घेतली जात नाहीत. त्यामुळे सूरज नारखेडे यांच्या नेतृत्वात नागरिकांनी बांधकाम विभागाच्या कार्यालयात धडक मारली. रस्त्यावरील खड्ड्यांचे फाेटाे काढून त्याची फ्रेम सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयात थेट भिंतीवर लावण्यात आली. प्रशासनाने दखल न घेतल्यास जुने जळगावातील नागरिक रास्ता राेकाे आंदाेलन करतील, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.