राज्यातून कोरोना हद्दपार, सण-उत्सव धुमधडाक्यात साजरा करा : आरोग्यमंत्री सावंत

चीनमध्ये करोनाचा संसर्ग पुन्हा डोकेदुखी ठरत आहे.यामुळे भारतासह महाराष्ट्रातही चिंतेची परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार का? याचीही चर्चा सुरू आहे. याबाबत शनिवारी, राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला.

महाराष्ट्रातून कोरोना हद्दपार झाला आहे. आगामी सण, उत्सव, ख्रीसमस आणि नवीन वर्ष धुमधडाक्यात साजरे करा असे वक्तव्य आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केले.

आमदार जयकुमार गोरे यांची विचारपूस करण्यासाठी मंत्री तानाजी सावंत रुबी हॉस्पिटलमध्ये आले होते. ते म्हणाले, आमदार गोरे यांची प्रकृती उत्तम आहे, घाबरण्याचे काही कारण नाही. ते माझ्याशी देखील बोलले, आणि हसत हसत बोलले आहेत. त्यांची प्रकृती उत्तम ठणठणीत उत्तम असल्याचे मंत्री सावंत म्हणाले

About विश्व भारत

Check Also

सिर्फ अवैध मदरसों पर कार्रवाई : अल्पसंख्यक मंत्री अंसारी का बयान

सिर्फ अवैध मदरसों पर कार्रवाई : अल्पसंख्यक मंत्री अंसारी का बयान टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक …

नागपूर महानगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात मोठी बातमी

नागपूर जिल्ह्यात भाजपने सध्या महापालिका, जिल्हा परिषद आणि अन्य विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विरोधी पक्षाच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *