परस्पर विकली 400 एकर जमीन

कोल्हापुरातील दख्खनचा राजा श्रीक्षेत्र ज्योतिबा देवस्थानच्या मालकीची चारशे एकर जमीनी परस्पर विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. या प्रकरणाची चौकशी देवस्थान समितीने सुरू केली. मात्र तत्कालीन सरकारच्या मंत्र्यांच्या पुढाकारानेच हे सगळे प्रकार घडले आहे,असा आरोप करीत याची चौकशी करण्याची मागणी भाजपचे नेते आणि देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव यांनी केली.

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र जोतिबाची जमीन परस्पर विक्री केलाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने जमिनीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, असता हा सगळा प्रकार पुढे आलाय. देवस्थान समिती कडे असलेल्या जोतिबाच्या मानाच्या सासनकाठ्या नोंदणीच्या वेळी, कसायला दिलेल्या जमिनीची कागदपत्र दाखवण्याची अट घातल्याने हा प्रकार उघडा पडला.

श्रीक्षेत्र जोतिबा देवस्थान कडे हजारो एकर जमीन आहे. यातील 50 एकर 100 एकर 200 एकर असे हिस्से महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील मानकरांकडे आहेत. वर्षानुवर्ष देवस्थानची जमीन देवाच्या नावाने कसणाऱ्या अनेक लोकांनी देवस्थानचं नाव काढून पहिलं नाव स्वतःच लावल्याची धक्कादायक माहिती आहे. तसा दावा केला जात आहे.

About विश्व भारत

Check Also

मतदानाचा ग्रामीण भागात उत्साह : शहरवासी उदासीनच

मतदान केंद्रात तोडफोड, काही ठिकाणी मतदान यंत्रात बिघाड तसेच प्रतिस्पर्धी उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांमध्ये संघर्षाच्या …

राज्यातील अनेक मतदान केंद्रावर ईव्हीएम मध्ये तांत्रिक बिघाड

महिनाभर प्रचाराने गाजलेल्या विधानसभा निवडणुकीचे मतदान आज, बुधवारी होत असून, त्यात ४,१३६ उमेदवारांचे भवितव्य ठरणार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *