Breaking News

उंचीनुसार मुलींचे वजन किती पाहिजे…!

Advertisements

सध्याच्या घडीला फीट आणि निरोगी राहणं हे एक मोठं आव्हान आहे. आजकालच्या जीवनशैलीमुळे सर्वांचा एकच प्रश्न असतो, तो म्हणजे वजनात होणारी वाढ,अयोग्य आहार आणि बदलती जीवनशैली यामुळे लठ्ठपणाची समस्या काही आपली पाठ सोडत नाही. अनेकदा पुरुषांच्या तुलनेत महिलांना वजनाची समस्या अधिक भेडसावते.

Advertisements

वजन कमी करण्यासाठी महिला अनेक टिप्सचाही वापर करतात. महिलांची कंबर, हिप्स आणि पोटाची चरबी वाढली की त्यांना ते आवडत नाही. बर्‍याच वेळा महिला हेवी वर्कआउट आणि डाएट कंट्रोल या माध्यमातून वजन कमी करतात. पण फार कमी लोकांना माहिती असतं की, उंचीनुसार त्यांचं किती वजन असलं पाहिजे.

Advertisements

उंचीनुसार वजनाचा समतोल असला पाहिजे
आपल्यासाठी हे जाणून घेणं महत्वाचं आहे की, निरोगी व्यक्तीचं वजन, वय आणि उंची किती असावी. तज्ज्ञांच्या मते, उंचीनुसार वजनाचा समतोल हा उत्तम आरोग्याचा निकष आहे. यासाठीच आज आम्ही तुम्हाला तुमच्या उंचीनुसार तुमचं वजन किती असावं याबाबत माहिती देणार आहोत.

पहा उंचीनुसार किती असावे वजन

*4 फूट 10 इंच उंची असलेल्या व्यक्तीचं सामान्य वजन 41 ते 52 किलो असावं. यापेक्षा जास्त वजन ओव्हरवेटच्या श्रेणीमध्ये येतं.
*5 फूट उंचीच्या व्यक्तीचं सामान्य वजन 44 ते 55.7 किलो दरम्यान असावं. हे निरोगी शरीराचं लक्षण आहे.
*5 फूट 2 इंच उंच असलेल्या व्यक्तीचं हे वजन 49 ते 63 किलो दरम्यान असावं.
*5 फूट 4 इंच उंच असलेल्या व्यक्तीचं सामान्य वजन 49 ते 63 किलो दरम्यान असावं.
*5 फूट 6 इंच उंच असलेल्या व्यक्तीचं सामान्य वजन 53 ते 67 किलो दरम्यान असलं पाहिजे.
*5 फूट 8 इंच उंच असलेल्या व्यक्तीचं सामान्य वजन 56 ते 71 किलो दरम्यान असलं पाहिजे
*5 फूट 10 इंच उंच असलेल्या व्यक्तीचं सामान्य वजन 59 ते 75 किलो दरम्यान असावं.
*6 फूट उंच व्यक्तीचं सामान्य वजन 63 ते 80 किलो दरम्यान असावं.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

‘ब्लड प्रेशर’मध्ये ‘चालणे’ किती महत्वाचे?

धावपळीच्या जीवनात स्वतःला फिट ठेवण्यासाठी तासन् तास जिममध्ये घाम गाळणे प्रत्येकालाच शक्य नसते. अशा वेळी …

नागपुर : डागा स्त्री अस्पताल बना ‘लापरवाही का अड्डा’

नागपुर : डागा स्त्री अस्पताल बना ‘लापरवाही का अड्डा’ टेकचंद्र शास्त्री: 9822550220   नागपुर। धुएं …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *