थंडी वाढत आहे. थंडीला नियंत्रणात ठेवण्यासाठी काही खास गोष्टी तुम्हाला करता येतील. काही पेये शरीर उबदार ठेवण्यासाठी मदत करतील.
✳️हिवाळ्यात बदामाचे दूध पिणेही फायदेशीर असते. बदामाचा प्रभाव उष्ण असतो. हे तुमचे शरीर गरम करेल. बदाम बारीक करून त्यात दूध घालून प्या. त्यामुळे जीवनसत्त्वे आणि खनिजांची कमतरताही पूर्ण होईल.
✳️लिंबू घालून गरम पाणी प्यायल्यास शरीर उबदार राहते. गरम लिंबू पाणी प्यायल्याने तुमच्या शरीराची प्रतिकारशक्तीही वाढेल.
✳️हिवाळ्यात हळदीचे दूध पिणेही उत्तम असते. हळदीमध्ये अँटिऑक्सिडेंट, अँटीव्हायरल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. ते शरीराला आतून उबदार ठेवण्यास मदत करतात.
✳️दालचिनीमध्ये अँटिऑक्सिडेंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात. हिवाळ्यात शरीर आतून उबदार ठेवायचे असेल तर दालचिनी पाण्यात उकळून प्या. याचा तुम्हाला फायदा होईल.
✳️हिवाळ्यात तुम्ही हर्बल चहा पिऊ शकता. हर्बल चहा प्यायल्याने शरीराला ऊब मिळते तसेच शरीरालाही आतून उबदार ठेवते. हिवाळ्यात तुम्ही ग्रीन टी, तुळशीचा चहा आणि आल्याचा चहा पिऊ शकता.