Breaking News

आमदाराला लग्नासाठी साकडे : एखादे स्थळ बघा! तरुणाची मागणी

लग्नासाठी मुलगी मिळणे कठीण होत आहे. आता काही तरुणांनी वेगळीच शक्कल लढविली आहे. आमदार साहेब, मी खुलताबाद तालुक्यातील ग्रामीणमधून बोलतोय. माझी आर्थिक परिस्थिती चांगली आहे. आठ-नऊ एकर जमीन आहे. तरीही इकडे मुली देत नाहीत. तुमच्या तालुक्यात खूप मुली आहे, एखादे स्थळ बघा, अशी मागणी आमदार उदयसिंग राजपूत यांच्याकडे एका तरूणाने फाेनवरून केली. यामुळे ‘शेतकरी नवरा नको ग बाई’ हा विषय पुन्‍हा एकदा ऐरणीवर आला आहे.

ग्रामीण भागात चांगली शेती असूनही, शेतकऱ्यांच्या मुलांना लग्नासाठी मुली मिळत नसल्याचे चित्र आहे. मुलींना शहरात खासगी कंपनीत किंवा सरकारी नोकरी असणारा जोडीदार हवा असल्याने ग्रामीण भागातील शेतकरी मुलांना वधू शोधताना दमछाक होत आहे.

आमदार राजपूत यांना तालुक्यातुन आमच्या गावात रस्ते करा, पाण्याची सोय करा, डीपी दया, आदी विविध कामासाठी कार्यकर्ते तसेच नागरिकांचे फोन येत असतात. मात्र दुसऱ्या तालुक्यातील तरुणाने थेट फोनवर “तुमच्या तालुक्यात खूप मुली आहेत. साहेब, एखादे स्थळ बघा, अशी मागणी केली. आमदार राजपूत यांनी तुझा बायोडाटा पाठवून दे बघतो म्हणून तरुणाचे समाधान केले. याबाबतची माहिती आमदार राजपूत यांनी माध्यमांना दिली.

About विश्व भारत

Check Also

तरुणांना प्रशासनासोबत कामाची संधी : ६० हजार रुपये वेतन

राज्यातील तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव मिळावा व त्यासोबतच त्यांच्या ज्ञानाच्या, अनुभवाच्या कक्षा रुंदावण्यास मदत …

12 वीं पास युवाओं के लिए 15 हजार पदों पर निकली भर्ती

12 वीं पास युवाओं के लिए 15 हजार पदों पर निकली भर्ती टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *