जैन कलार समाज निवडणूक 25 डिसेंबर रोजी झाली. मात्र निवडणूक मोजणीसाठी तब्बल आठ दिवस लागले. त्यामुळे या निवडणूकीत घोळ झाला आहे, असा दावा विरोधकांनी केला असून धर्मादाय उपायुक्त न्यायालयात दाद मागितली आहे. यावर प्राथमिक सुनावणीत स्थगिती मिळाली. पुन्हा एकदा धर्मादाय उपायुक्तांनी ही स्थगिती 24 जानेवरीपर्यंत कायम ठेवली.
जैन कलार समाज न्यासाच्या निवडणूकीत मतमोजणीतील घोळ आणि निवडणूक अधिकाऱ्यांच्या नियमबाह्य वर्तनामुळे धर्मादाय आयुक्तांनी निवडणूक निकाल प्रक्रियेवर 14 जानेवारीला स्थगिती दिली होती. पुढील सुनावणी 20 जानेवारी रोजी ठेवली होती. धर्मादाय आयुक्तांनी कार्यकारिणीसह निवडणूक अधिकाऱ्यांना नोटीस बजावून प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले होते.
25 डिसेंबरला जैन कलार समाजाच्या मध्यवर्ती समितीसाठी तसेच जिल्हा समितीसाठी एकूण 26 केंद्रांवर मतदान पाड पडले होते.26 डिसेंबरला मतमोजणी अपेक्षीत होती. मात्र,तसे न होता पाच दिवसांनंतरही संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांकडून निकाल घोषित करण्यात आला नाही.
मतमोजणी प्रक्रियेतील घोळामुळे मतांमध्येही मोठी तफावत दिसून आली. एकूण सभासद 18 हजार होते.पैकी 11 हजार 127 सभासदांनी मतदान केले.निकाल विलंबाने घोषित,दबावतंत्राचा वापर आणि अन्य मार्गाने निवडणूकीत बाधा पोहोचविणे अशा अनेक कृती, घोटाळा झाल्याचे दर्शवितात. ही संपूर्ण प्रक्रियाच रद्द करुन पुन्हा निवडणूक घेऊन निवडणूक झाल्यास सत्ताधारी कार्यकारिणीकडून खर्च वसूल करावा,अशी विनंती ‘आपुलकी’पॅनलने केली आहे.