बागेश्वर सरकारनी नागपुरात दावे सिद्ध करावे : प्रा. श्याम मानव

मध्य प्रदेशातील बागेश्वर धामचे पीठाधीश धीरेंद्र कृष्ण शास्त्री अर्थात बागेश्वर सरकार यांनी भक्तांसमोर नव्हे तर नागपुरातील पत्रकार भवनात आपले चमत्काराचे दावे सिद्ध करावे, असे आव्हान अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष प्रा. श्याम मानव यांनी दिले.

बागेश्वर सरकार यांचे समर्थक, विहिप, बजरंग दल आणि इतर हिंदुत्ववादी संघटना नागपुरात शुक्रवारी रस्त्यावर उतरल्या. संविधान चौक येथे झालेल्या आंदोलनात अंनिसचे प्रा. श्याम मानव यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांनी हस्तक्षेप करीत हा पुतळा ताब्यात घेतला. बराच वेळ हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.

आमदार मते काय म्हणाले?

केवळ हिंदू धर्मियांना बदनाम करण्याचे हे कटकारस्थान असून, हे कदापी सहन करणार नाही, असा इशारा या वेळी देण्‍यात आला होता. तर नागपुरातील कार्यक्रमाचे आयोजक आमदार मोहन मते यांनी अंनिसने इतर धर्मीयांबाबत असा भांडाफोड करावा, आपण माहिती देण्यास तयार आहोत, अशी भूमिका जाहीर केली.

मानव काय म्हणाले?

प्रा. श्याम मानव यांनी ‘आपल्याला सनातन धर्म शिकवू नये, मी मा. गो. वैद्य यांना गुरू मानले म्हणून माझा संघाशी संबंध जोडला जाऊ शकत नाही. भविष्याचा वेध घेण्याची शक्ती त्यांच्यात असेल तर ती दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी, सीमा रक्षण, देशहितासाठी वापरता येईल’ असे आव्हान त्यांनी केले. नुकतेच प्रा. श्याम मानव यांचे बागेशवर महाराज उर्फ धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्याविरोधात व्याख्यान झाले. यावेळी दोन्ही बाजूने जोरदार घोषणाबाजी झाली.30 लाखांचे अनिसंचे आव्हान न स्वीकारताच बागेश्वर सरकार यांनी नागपुरातून पळ काढला, असा आरोप अनिसने केला. मात्र, अनिसच्या लोकांनी रायपूरला यावे, आम्हाला तीस लाख नको आपण त्यांचे पूर्णतः समाधान करू असे प्रतिआव्हान बागेश्वर सरकार यांनी अनिसला दिले.

About विश्व भारत

Check Also

चमत्कारिक श्री हनुमान मंदिर में कार्तिक पूर्णिमा पर होगा भव्य आयोजन

चमत्कारिक श्री हनुमान मंदिर में कार्तिक पूर्णिमा पर होगा भव्य आयोजन टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक …

प्रफुल्ल गुडधे देणार फडणवीसांना जोरदार टक्कर

दक्षिण-पश्चिम नागपूर या आपल्या पारंपरिक विधानसभा मतदारसंघातून भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *