Breaking News

संपामुळे होणार ‘काम ठप्प’; जुन्या पेन्शनसाठी नागपुरातील संघटना आक्रमक

महसूल कर्मचारी संघटना,महाराष्ट्र राज्य महानगरपालिका, नगरपालिका-नगरपरिषद कर्मचारी संघटना फेडरेशनच्या वतीने 14 मार्चपासून पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी बेमुदत संपाला नागपूर महापालिकेतील राष्ट्रीय नागपूर कॉर्पोरेशन एम्प्लॉईज असोसिएशन (इंटक) व महाराष्ट्र जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेने पाठिंबा दर्शवला आहे. यांसदर्भात नागपूर मनपा प्रशासनाला संपाची नोटीस पाठवण्यात आली आहे. या संपात महापालिका व जिल्हा परिषदेतील सर्वच विभागातील कर्मचारी सहभागी होणार असल्याने दैनंदिन कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

मागण्या कोणत्या…

महापालिका कर्मचाऱ्यांच्या मागण्यांमध्ये महापालिका कर्मचारी व शिक्षकांना सातव्या व सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी देण्यासाठी शासनाने आर्थिक मदत करावी. शासन निर्णयाप्रमाणे सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना लागू करावी. नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन लागू करावी, कंत्राटी कामगारांना किमान वेतन देऊन त्यांना नोकरीत कायम करावे, अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्या विनाशर्त करण्यात याव्या, शासन निर्णयानुसार वाहतूक भत्ता लागू करावा, मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नती द्यावी,सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्यात यावे, मनपातील कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या रिक्त जागा भरण्यात याव्या. सफाई कामगारांना स्थायी करताना अधिसंख्य पदे निर्माण करून ज्यांची सेवा 20 वर्षे झाली त्यांना कायम करण्यात यावे.

कारवाई…

संपात सहभागी होऊ नये, यासाठी सरकारने शासन परिपत्रक निर्गमित केले आहे. संपात सहभागी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे सरकारने स्पष्ट केले आहे.

About विश्व भारत

Check Also

BJP प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा मुलगा कारमध्ये असल्याचे उघड : प्रशासनाचा धक्कादायक खुलासा

सध्या गाजत असलेल्या नागपूरच्या ‘हिट अँड रन’ प्रकरणी पोलिसांनी मंगळवारी आणखी एक महत्वाची माहिती उघड …

प्रेयसीचा खून करून नागपुरजवळील रामटेकच्या जंगलात पुरला मृतदेह

लग्नाचा तगादा लावणाऱ्या प्रेयसीचा प्रियकराने खून करून तिचा मृतदेह नागपूरजवळील जंगलात पुरला. ही घटना मंगळवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *