Breaking News

संपातून माघार : आजपासून काही संघटना कामावर

जुनी पेन्शन योजना पूर्ववत करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही सकारात्मक असल्याने या संपातून माघार घेत असल्याची घोषणा राज्यातील प्राथमिक शिक्षकांची शिखर संघटना ‘महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने जाहीर केले.जुनी पेन्शन योजना राबविण्यासाठी सरकारला वेळ देण्यास संघाची तयारी असल्याचे प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष संभाजी थोरात यांनी सांगितले. त्याचबरोबर आरोग्य संघटनांनीही या संपातून माघार घेत असल्याचे जाहीर केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रशासकीय अधिकारी आणि प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष संभाजी थोरात तसेच आरोग्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची एक विशेष बैठक विधानभवनात पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी संघटनांना शासनाची भूमिका समजावून सांगितली.

जुनी पेन्शन योजना राबविण्यासाठी शासन सकारात्मक असून शासकीय कर्मचाऱ्यांना संरक्षण देण्याचे तत्त्व सरकार म्हणून आपल्याला मान्य असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बैठकीत सांगितले. तसेच शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत अभ्यास समिती स्थापन करण्याची गरज त्यांनी या संघटनांना समजावून सांगितली. ही समिती येत्या दोन दिवसांत जाहीर करण्यात येणार असून या समितीमध्ये सचिव दर्जाचे प्रशासकीय अधिकारी आणि शिक्षक संघटना, आरोग्य संघटनेचे पदाधिकारी देखील समाविष्ट असतील, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.

नर्सेसला नोकरीत कायम करा

राज्यात उपजिल्हा रुग्णालयात बॉण्डेड नर्सेस आहेत. त्यांना अजूनही नोकरीत कायम करण्यात आलेले नाही. या मागणीकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात येत आहे. 20 ते 25 वर्षांचा अनुभव, कोरोना काळात रुग्णाची सेवा केली, तरीही सरकार लक्ष देत नाही, असा आरोप करीत मुंबईत आंदोलन करण्यात आले.

About विश्व भारत

Check Also

बदल्यांसाठी किती पैसे दिले? मंत्री काय म्हणाले?

राज्यातील शालेय शिक्षण विभागामध्ये बदल्यांसाठी गैरप्रकार होत असल्याचा आरोप करण्यात आला होता. यामुळे सर्वत्र खळबळ …

तरुणीचे शारीरिक शोषण करणाऱ्या ‘पीडब्लूडी’ अधिकाऱ्याला अटक

लग्नाचे आमिष दाखवत ३० वर्षीय तरुणीचे मागील ७ वर्षांपासून शारीरिक शोषण करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागातील(पीडब्लूडी)अधिकारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *