Breaking News

लक्ष द्या!थंड चहा पुन्हा-पुन्हा गरम करून पिताय?आजारांचा धोका

घरात पाहुणे आले, कधी पाऊस पडला, थंडी, थकवा, डोकेदुखी किंवा आळस येत असेल तर या सर्वांसाठी एकच पर्याय सुचतो, तो म्हणजे चहा…जणू चहा म्हणजे सर्व आजारांवरच औषधच! त्यातच दुधाच्या चहाची इतकी क्रेझ की, सकाळी उठल्याबरोबर अनेकजण रिकाम्या पोटी चहा लागते. पण रिकाम्या पोटी चहाचे सेवन कधीही करू नये. कारण रिकाम्या पोटी चहा शरीरासाठी घातक ठरू शकतो. त्यात कहर म्हणजे अनेकजण उरलेला चहा पुन्हा गरम करून पितात.चहा पुन्हा गरम केल्यानंतर पिण्याचे शरीराला काय नुकसान आहेत, ते जाणून घेऊया.

चहा पुन्हा गरम केल्याचे नुकसान

नव्याने चहा बनवण्याचा त्रास होऊ नये म्हणून अनेकजण चहा पुन्हा गरम करुन पित असतात. तसेच चहा पुन्हा गरम केल्याने गॅसची बचत होते. पैशांची बचत होते आणि कार्बन फूटप्रिंट कमी होण्यास मदत होते असे विचार करणारे अनेकजण आहेत. पण एका संशोधनात असे निदर्शनात आले की, उरलेला चहा हा गरम करून पियालयाने शारिरीसाठी घातक ठरू शकतात.

चव आणि सुगंध कमी होणे

चहा पुन्हा गरम करण्याचा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा तोटा म्हणजे, चहाचा ताजेपणा आणि चव निघूण जाते. एवढेच नाही तर चहा पुन्हा गरम केल्याने त्यातील अनेक पौष्टिक गुणधर्मही दूर होतात.

सूक्ष्मजीव वाढ

जर तुम्ही चहा 4 तासांपेक्षा जास्त वेळानंतर पुन्हा गरम करून प्यायचा विचार करत असाल तर तुम्ही ही सवय ताबडतोब बंद करा. कारण उरलेला चहामध्ये बॅक्टेरिया यांसारखे सूक्ष्म जीव वाढवतो आणि तुमच्या आरोग्याला मोठ्या प्रमाणात हानी पोहोचवू शकतो.भारतात वापरल्या जाणार्‍या चहाचा प्रकार म्हणजे दुधाचा चहा, ज्यामधून जिवाणूंच्या वाढीचा दर जास्त असतो. जेव्हा हर्बल टीचा विचार केला जातो तेव्हा ते त्यांचे सर्व पोषक आणि खनिजे गमावतात जे जास्त गरम केल्यावर फायदेशीर ठरतात.

… तर गंभीर आजार

पुन्हा गरम केलेला चहा पिणे खूप धोकादायक असू शकते, कारण जेव्हा आपण चहा पुन्हा गरम करतो तेव्हा सर्व खनिजे आणि चांगले संयुगे बाहेर पडतात आणि त्यामुळे तो पिणे धोकादायक बनते. जर तुम्ही चहा पुन्हा गरम करण्याची सवय सोडली नाही तर तुमचे आरोग्य बिघडू शकते आणि पोट खराब होणे, जुलाब, पेटके, गोळा येणे, मळमळ यासारख्या पाचन समस्या पुन्हा उद्भवू शकतात, असे दिसते.

About विश्व भारत

Check Also

भूमि आंवला आयुर्वेदिक औषधीय अनेक प्रकार की बीमारियो को करती है ठीक

भूमि आंवला आयुर्वेदिक औषधीय अनेक प्रकार की बीमारियो को करती है ठीक टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

पोटाचा घेर कमी करायचा? तर ‘या’ झाडाला आजच घरी लावा

वजन कमी करण्यासाठी असा करा…! हेल्थलाइननुसार, आंब्याच्या पानांमध्ये अँटिऑक्सिडंट्स, वनस्पती संयुगे, पॉलिफेनॉल, टेरपेनॉइड्स इ. प्रतिकारशक्ती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *