Breaking News

पोट-आतड्यांच्या कॅन्सरने तरुणांमध्ये भीती : खानपान मोठे कारण

Advertisements

कॅन्सर मोठ्या आतड्यांत साधारण वाढीसह सुरू होऊन कालांतराने शरीराच्या दुसऱ्या भागात पसरू शकतो. पुरुष व महिलांत त्याची जोखीम समान असून वयोमानासह त्याचा धोका वाढत जातो.

Advertisements

आकडे काय सांगतात?

Advertisements

अमेरिकेत ३० ते ३४ वर्षांच्या १ लाख लोकांमध्ये केवळ ५ रुग्ण आढळतात. ५० ते ५४ वर्षांच्या लोकांत ६१ आणि ७० ते ७४ वर्षे वयाच्या लोकांत १३६ रुग्ण आढळतात. लठ्ठपणा किंवा काही खाद्यपदार्थ, पेय (रेड मीट, हॉट डॉग, दारू) आणि खराब जीवनशैली याचा धोका वाढवतात. ऑस्ट्रेलियातील मेलबर्न स्कूल ऑफ पॉप्युलेशन अँड ग्लोबल हेल्थचे प्रमुख डॉ. नॅन्सी बॅक्सटर म्हणाल्या की, मलाशयातून रक्तस्राव, अॅनिमिया, पोट साफ न होणे, पोटदुखी याची सुरुवातीची लक्षणे आहेत.

फायबरयुक्त फळे

भाज्या व २० मिनिटांचा व्यायाम या धोक्यापासून वाचवू शकतो

रेड मीट टाळा

हॉट डॉग, बेकन मीट किंवा रेड मीट खाणे टाळा. फळ, भाज्या, अख्खे कडधान्य आणि फायबरयुक्त स्नॅक्स खा.

धूम्रपान करू नका

सिगारेटमधील ७० रसायने आपल्या कोशिकांत डीएनएला नुकसान पोहोचवून कॅन्सरचा धोका वाढवतात. निकोटिन पॅच व क्विकस्टार्टसारखे अॅप सिगारेट सोडण्यास मदत करू शकतात. जास्त मद्यपान या कॅन्सरचा धोका वाढवू शकते.

सक्रिय राहा

संशोधनानुसार अॅक्टिव्ह लोकांच्या तुलनेत सुस्त लोकांत कोलोन कॅन्सरची शक्यता अधिक आहे. दर आठवड्याला १५० मिनिटे व्यायाम, जसे सायकलिंग स्विमिंग आणि गार्डनिंग आणि दोन दिवस मांसपेशींना मजबूत करण्याचा व्यायाम (वजन उचलणे किंवा पुशअप) करायला हवा.

वजन नियंत्रित ठेवा

वजन वा लठ्ठपणाचा सामना करत असाल तर डॉक्टरांशी संपर्क साधून सल्लामसलत करा. संशोधनात आढळले की, संतुलित वजन असलेल्यांत याचा धोका कमी आहे.

हा कॅन्सर पीकवर पोहोचल्यानंतर वृद्धांतील प्रमाण घटले होते. मात्र तरुणांतील त्याचा कल धोकादायक आहे. ५० वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांत हा कॅन्सर आक्रमक होत आहे. या अहवालानुसार भारतीय वंशाच्या लोकांत या कॅन्सरची जोखीम सर्वाधिक आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

कमलिनी जड़ की सब्जी का मटन से अच्छा लजीज स्वाद : चखकर मनपसंद लडका रिश्ता पक्का करेगा!

कमलिनी जड़ की सब्जी का मटन से अच्छा लजीज स्वाद : चखकर मनपसंद लडका रिश्ता …

उन्हाळ्यात थंडगार बर्फाचे पाणी पित असाल तर..!

शरीरातील पाण्याची पातळी राखणे हे शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, त्यामुळे तज्ज्ञ रोज १० ते १२ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *