Breaking News

अक्षय कुमार, टायगर श्राफ जखमी : शूटिंगमध्ये अपघात

Advertisements

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. अक्षय कुमार आगामी चित्रपटाच्या अ‍ॅक्शन सीनच्या चित्रीकरणादरम्यान जखमी झाला आहे. अक्षय कुमार त्याच्या फिटनेससाठी ओळखला जातो. तो त्याच्या फिटनेसची खूप काळजी घेतो. त्यामुळे तो त्याने ठरवल्यानुसार पोषक आहार खातो.

Advertisements

रात्री लवकर झोपतो आणि पहाटे लवकर उठून व्यायाम करतो. त्याच्या या जीवनशैलीचं नेहमी कौतुक होत असतं. त्याची आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे तो चित्रपटामध्ये अ‍ॅक्शन सीनच्या शूटींग दरम्यान स्वत: स्टंट करतो. यासाठी तो कुणाचीही मदत घेत नाही. पण त्याचा हाच आत्मविश्वास त्याच्यासाठी घातक ठरला आहे. कारण एका चित्रपटाच्या शूटींग दरम्यान अपघाताची घटना घडलीय.

Advertisements

अभिनेता टायगर श्रॉफ आणि अक्षय कुमार यांचा एक चित्रपट आगामी काळात प्रदर्शित होणार आहे. त्याच्या चित्रीकरणादरम्यान दुर्घटना घडली आहे. अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफचा ‘बडे मियां छोटे मियां’ असा चित्रपट आगामी काळात प्रदर्शित होणार आहे. याच चित्रपटाच्या शूटींगदरम्यान अ‍ॅक्शन सीन चित्रित करत असताना अपघात घडला. त्यामुळे अभिनेता अक्षय कुमार जखमी झाला आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

Tateeree गाने पर मचे बवाल पर आया बादशाह का रिएक्शन

Tateeree गाने पर मचे बवाल पर आया बादशाह का रिएक्शन टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   …

Thalapathy Vijay, Trisha Krishnan attend wedding together amid affair allegation by actor’s wife

Actor Thalapathy Vijay attended a wedding in Chennai with actress Trisha Krishnan on Thursday, days …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *