औरंगाबाद विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी अचानक सिल्लोड तहसील कार्यालयात भेट दिली. त्यात अनेक नायब तहसीलदार आणि कर्मचारी गैरहजर होते. त्यामुळे केंद्रेकर कुणावर कारवाई करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अलीकडे सिल्लोड तहसील कार्यालयात सावळागोंधळ सुरु असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे आता कामचुकार कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
