Breaking News

डोळे मारण्याचा हंगाम…आणि गौतमी पाटील : कृषीमंत्री अब्दुल सत्तार

नृत्यांगना गौतमी पाटील सध्या खूप चर्चेत आहेत. राज्यात अनेक ठिकाणी यात्रा, वाढदिवसनिमित्त गौतमी पाटील हीच्या डान्स शोचं आयोजन केलं जात आहे. पुण्यातल्या मुळशी तालुक्यात गौतमी पाटीलने एका बैलासमोर डान्स केल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. याबद्दल पुण्यात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीने विरोधी पक्षनेते अजित पवारांना प्रश्न विचारला. त्यावर अजित पवार म्हणाले, ‘तुला काय वाईट वाटलं. ती बैलासमोर नाचेल नाहीतर आणखी कोणासमोर नाचेल. तुला का त्रास होतोय.”, अजित पवारांच्या या मिश्कील प्रतिक्रियेवर कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी चिमटे काढले आहेत.

 

अब्दुल सत्तार म्हणाले, ज्यांचं वय डोळे मारण्याचं ते डोळे मारतात. आजकाल डोळे मारण्याचा सीझन सुरू आहे. ज्यांचं वय आहे डोळे मारण्याचं ते डोळे मारतात, किंवा ज्यांनी लहानपणी डोळे मारले नसतील ते आता मारू लागले आहेत. अजित पवार जे काही बोलतात त्याला महत्त्व आहे. कारण ते राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते आहेत.

 

गौतमी पाटीलच्या डान्सच्या कार्यक्रमाबद्दल सत्तार यांना विचारल्यावर सत्तार म्हणाले, सिल्लोडला कृषी महोत्सवात मी त्यांचा कार्यक्रम मी बघितला आहे. तेव्हा खूप लोक होते. आपण पुन्हा एकदा हा कार्यक्रम ठेवू आणि त्यावेळी अजित पवारांना या कार्यक्रमाचं निमंत्रण देऊ.

 

यावेळी अब्दुल सत्तार यांना सवाल केला की, गौतमी पाटीलचा डान्स पाहता का? त्यावर सत्तार म्हणाले, मी सिल्लोडला त्यांचा कार्यक्रम पाहिला होता. परंतु मी लावण्या अनेकदा पाहिल्या आहेत. आपल्या राज्यात लावणी ही संस्कृती आहे. मी कधी डान्सबारमध्ये गेलो नाही, परंतु लावण्या पाहतो. कारण या नृत्यांगनांचा डोक्यापासून पायापर्यंत मराठी संस्कृतीला शोभेल असा वेश असतो. आपल्या संस्कृतीला शोभेल अशा लावण्यात असतात.

तलाठी पद रद्द करणार?

तलाठी हे पद रद्द करण्यासंदर्भात मुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांशी चर्चा करणार आहे. तेलगना राज्यात तलाठी पद रद्द करण्यात आले आहे, असा दाखला देत सत्तार बोलले.

About विश्व भारत

Check Also

अमरावती में काँग्रेस का धरना : राहुल गांधी के खिलाफ अभद्र टिप्पणी करने वालों के खिलाफ केस दर्ज

अमरावती में काँग्रेस का धरना : राहुल गांधी के खिलाफ अभद्र टिप्पणी करने वालों के …

केजरीवाल को लेकर उद्धव ठाकरे ने BJP पर साधा निशाना

केजरीवाल को लेकर उद्धव ठाकरे ने BJP पर साधा निशाना टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *