Breaking News

नागपुरात २३ लाखांची रेल्वे तिकिटे जप्त : एका दलालास अटक

लग्नसराईचे दिवस लक्षात घेता रेल्वे प्रवाशांकडून चढ्या दराने तिकिट विक्री करणाऱ्या एका दलालास नागपूर रेल्वे पोलिसांनी अटक केली.

यात सुमारे ८३ लाख रुपयांच्या ऑनलाइन तिकिट विक्रीचा व्यवहार उघडकीस आला आहे.

प्रवीण झाडे असे या ४३ वर्षीय दलालाचे नाव असून तो प्रोफेसर कॉलनी हनुमान नगर येथील रहिवासी आहे. आरपीएफने या कारवाईत दोन लॅपटॉप एक मोबाईल प्रिंटर जप्त केले.यावेळी चौकशीत एक विशेष सॉफ्टवेअर पोलिसांच्या हाती लागले. ज्या माध्यमातून एका क्लिकवर अनेक तात्काळ, सामान्य श्रेणीतील तिकीट बुक केली जात होती.हे सॉफ्टवेअर पाहून पोलीसही बुचकळ्यात पडले. डीएसएसी आशुतोष पांडे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक आर. एल. मीना आणि सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. अलीकडेच आर.पी.एफ.ने विमानतळावरील रेल्वे तिकीट काउंटरवरून होणारा काळाबाजार उघड केला. यावेळी हर्षित दिनेश जोशी या 33 वर्षीय दलालास अटक केली.रेल्वे कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.यामुळे रेल्वे तिकिटाच्या काळाबाजाराचे मोठे घबाड उघडकीस येण्याची शक्यता आहे.

About विश्व भारत

Check Also

बाथरूम के अंदर CRPF जवान ने खुद को मारी गोली : मचा हड़कंप

बाथरूम के अंदर CRPF जवान ने खुद को मारी गोली? कैंप में मचा हड़कंप टेकचंद्र …

पुलिस ने रेप पीड़िता को 15 दिन घुमाया : SP से शिकायत होते मचा हड़कंप

पुलिस ने रेप पीड़िता को 15 दिन घुमाया : SP से शिकायत होते मचा हड़कंप …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *