Breaking News

पेट्रोलपंप मालकावर गोळीबार : नागपूर हादरलं : प्रॉपर्टी की अनैतिक संबंधाचा वाद? वाचा

Advertisements

नागपूर जिल्ह्यातील भिवापूर येथील पेट्रोल पंप मालकाची दुचाकीवर आलेल्या तिघांनी चाकू भोसकून हत्या केली. बुधवारी घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. दिलीप राजेश्वर सोनटक्के (वय ६०) रा. दिघोरी नागपूर असे मृत पेट्रोल पंप मालकाचे नाव आहे.

Advertisements

दिलीप सोनटक्के यांचा भिवापूर येथे राष्ट्रीय महामार्गावर पेट्रोल पंप आहे. दिलीप रोजच्याप्रमाणे सकाळी दहाच्या सुमारास नागपूरहून कारने भिवापूर पेट्रोल पंपावर आले. ते पंपाच्या कार्यालयात बसले असताना दहा ते पंधरा मिनिटांनी दुचाकीवरून तिघांनी पेट्रोल पंपाच्या कार्यालयात घुसून दिलीप यांच्यावर धारदार चाकूने हल्ला केला. यावेळी दोन कामगार बाजूच्या खोलीत हिशोब करत होते तर दोन कामगार बाहेर मशीनवर काम करत होते.

Advertisements

आरोपींनी कर्मचाऱ्यांना पिस्तुल दाखवून धमकावले, त्यानंतर कर्मचाऱ्यांनी पळ काढला. एका कर्मचाऱ्याच्या डोक्यात पिस्तुलाचा मार लागला. कर्मचाऱ्याने पळ काढताच दिलीपला रक्ताच्या थारोळ्यात टाकून आरोपींनी पेट्रोल पंपाच्या गल्ल्यातून सुमारे दोन लाख रुपये घेऊन पळ काढला. या घटनेचे सर्व लाइव्ह फुटेज पेट्रोल पंपाच्या आत आणि बाहेरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे.

दिलीप सोनटक्के हे भिवापूरजवळील मुळगाव कोलारी (जिल्हा चंद्रपूर) येथील रहिवासी आहेत. ते गेल्या अनेक वर्षांपासून नागपुरातील दिघोरी परिसरात कुटुंबासह राहतात. ते प्रॉपर्टी डीलच्याही व्यवसाय करतात. पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने ही हत्या करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसत असले तरी या हत्येमागे मालमत्तेचा वाद किंवा अनैतिक संबंधही कारणीभूत असल्याची चर्चा आहे.

(फाईल फोटो)

Advertisements

About विश्व भारत

Check Also

बहू-ससुर के बीच अनैतिक शारीरिक संबंध के चलते कर दी दोनो की हत्या

बहू-ससुर के बीच अनैतिक शारीरिक संबंध के चलते कर दी दोनो की हत्या टेकचंद्र शास्त्री: …

नागपुरातील काँग्रेस आमदाराने घेतली CM फडणवीसांची भेट

नागपूर कॉंग्रेसचे माजी शहराध्यक्ष आणि आमदार आमदार विकास ठाकरे यांनी शनिवारी रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *