Breaking News

राज्यात लोकसभेची पोटनिवडणूक कधी? दोन जागा रिक्त

Advertisements

माजी मंत्री आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्यापाठोपाठ चंद्रपूरचे काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांच्या निधनाने राज्यातील लोकसभेच्या दोन जागा रिक्त झाल्या आहेत. चंद्रपूरची जागा लोकसभेची मुदत संपण्यास एक वर्ष, १७ दिवस शिल्लक असताना रिक्त झाल्याने कायद्यातील तरतुदीनुसार १७ दिवसांचा फरक पडत असताना पोटनिवडणूक होणार का, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Advertisements

पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे २९ मार्च रोजी निधन झाले. लोकसभा अथवा विधानसभेची जागा रिक्त झाल्यावर सहा महिन्यांमध्ये ती जागा भरली गेली पाहिजे, अशी लोकप्रतिनिधी कायद्यात तरतूद आहे. म्हणजेच पुण्यात २९ सप्टेंबरपर्यंत पोटनिवणूक होणे अपेक्षित आहे. लोकसभा अथवा विधानसभेची जागा रिक्त झाल्यावर सहा महिन्यांच्या कालावधीत पोटनिवडणूक घेऊन ती जागा भरली पाहिजे, अशी लोकप्रतिनिधी कायद्यात स्पष्ट तरतूद असली तरी त्याला दोन अपवाद आहेत. लोकसभा अथवा विधानसभेचा कालावधी एक वर्षांपेक्षा कमी शिल्लक असला वा पोटनिवणूक घेण्यासाठी योग्य वातावरण नाही (कायदा वा सुव्यवस्था, नैसर्गिक आपत्ती, रोगराई इ.) तर पोटनिवडणूक टाळता येऊ शकते.

Advertisements

विद्यमान १७व्या लोकसभेची मुदत ही १६ जून २०२३ रोजी संपत आहे. चंद्रपूरची जागा एक वर्षांपेक्षा १७ दिवस अधिक कालावधी शिल्लक असताना रिक्त झाली आहे. यामुळे कायद्यातील तरतुदीनुसार पोटनिवडणूक घेणे बंधनकारक आहे. पुण्याची जागा तर मार्चअखेर रिक्त झाल्याने पोटनिवडणूक अटळ ठरते. परंतु एक वर्षांसाठी पोटनिवडणुकीला सामोरे जाणे राजकीय पक्षांनाही सोयीचे नसते. पुण्याची जागा २९ मार्चला रिक्त झाली आहे. पोटनिवडणूक मे अखेर किंवा जूनच्या सुरुवातीला होईल अशी अटकळ व्यक्त केली जात होती. कारण नंतर पावसाळा व सणासुदीचे दिवस सुरू होतात.पाऊस आणि सणासुदीच्या काळात शक्यतो निवडणुका टाळल्या जातात. पुण्याची जागा रिक्त होऊन दोन महिने उलटले तरी अद्यापही निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलेला नाही. पुण्याच्या पोटनिवडणुकीबाबत सत्ताधारी भाजप फारसा अनुकूल नसल्याचे समजते.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

नागपुर में आसान नहीं गडकरी की राह : काँग्रेस को जीत की उम्मीद

नागपुर लोकसभा सीट चर्चा में हैं। यहां से बीजेपी के दिग्गज नेता नितिन गडकरी चुनाव …

BJP के लिए महाराष्ट्र में कितना मुश्किल है 2019 वाला प्रदर्शन दोहराना? जानिए ग्राउंड रिपोर्ट

बीजेपी के लिए महाराष्ट्र में कितना मुश्किल है 2019 वाला प्रदर्शन दोहराना? जानिए ग्राउंड रिपोर्ट …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *