Breaking News

देशात घडला मोठा रेल्वे अपघात : अंदाजे 100 प्रवाशांचा मृत्यू

Advertisements

ओडिशामध्ये खूप मोठा रेल्वे अपघात घडला आहे. ओडिशातील बालासोर येथे कोरोमंडल एक्स्प्रेसची मालगाडीला धडक बसल्याने मोठा हाहाकार उडाला आहे. या अपघातात रेल्वे गाडीचे अनेक डब्बे पलटी झाले आहेत. मोठी जीवितहानी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अनेकजण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. कोरोमंडल एक्सप्रेस ही सुपरफास्ट ट्रेन आहे. अपघात खूप मोठा आहे. कोरोमंडल एक्सप्रेसचे चार ते पाच डब्बे पलटी झाले आहेत. तर 18 डब्बे रुळावरुन घसरले आहेत.

Advertisements

कोरोमंडल एक्सप्रेस ही चेन्नईहून हावडाकडे जात होती. ओडिशामधील बालासोरपासून 40 किमी अंतरावर ही एक्सप्रेस मालगाडीला धडकली आहे. या भीषण अपघातात कोरोमंडल एक्सप्रेसचे 18 डब्बे रुळावरुन घसरले आहेत. तर चार ते पाच डब्बे आडवे पडले आहेत. घटनास्थळी हाहाकार उडाला आहे. प्रचंड आक्रोशाचा आवाज येतोय.

Advertisements

घटनेची माहिती मिळताच परिसरातील स्थानिक नागरीक घटनास्थळी पोहोचले आहेत. रेल्वे पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. तसेच सिटी पोलीसही तिथे दाखल झाले आहेत. घटनास्थळी मोठी रेस्क्यू टीम दाखल होत आहे. रुग्णवाहिका, डॉक्टर दाखल होत आहेत. घटना खूप मोठी आहे. अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पण याबाबत अधिकृत अशी माहिती समजू शकली नाही.

बचाव पथकाचं कार्य युद्ध पातळीवर सुरु
ही घटना नेमकी का घडली? मालगाडी नेमकी तिथे का उभी होती? असे अनेक प्रश्न आहेत. या प्रकरणी योग्य तो तपास होणं गरजेचं आहे. पण आधी अपघातग्रस्त नागरिकांना वाचवणं जास्त महत्त्वाचं आहे. घटनास्थळी सध्या बचावाचं कार्य युद्ध पातळीवर सुरु झालं आहे. ही अशी घटना अनपेक्षित होती. पूर्व भारतातून दक्षणि भारताकडे जाण्यासाठी कोरोमंडल एक्सप्रेम महत्त्वाची मानली जाते. पण अशाच सुपरफास्ट एक्सप्रेसचा अशाप्रकारे अपघात झाल्याने संपूर्ण देश हादरला आहे.

संबंधित घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाकडून इमर्जन्सी कंट्रोल रुमचा 6782262286 हा फोन नंबर जारी करण्यात आला आहे. बाधितांनी मदतीसाठी या क्रमांकावर फोन करावा, असं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान, या रेल्वे अपघातावर रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही प्रतिक्रिया जारी करण्यात आलेली नाही. घटनास्थळी कलेक्टर दाखल झाले आहेत. बचाव पथकाचं काम युद्ध पातळीवर सुरु आहे. ही ट्रेन चेन्नई येथून सुटते. त्यानंतर ती ओडिशातून पश्चिम बंगालच्या हावडा येथे जाते.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

राज ठाकरेंनी दिला BJP ला पाठिंबा

मला शिवसेना पक्षप्रमुख व्हायचं असतं तर अमित शाह यांच्या भेटीनंतर काही होत नाही त्यांना लक्षात …

काँग्रेस आमदार राजू पारवेंचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश

उमरेडचे काँग्रेस आमदार राजू पारवे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. राजू पारवे हे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *