मुंबई विमानतळावर प्रवाशांचा गोंधळ : विमानांच्या वेळापत्रकात बदल

मुंबईसह महाराष्ट्र आणि गुजरातच्या पश्चिम किनारपट्टीवर बिपरजॉय चक्रीवादळामुळे वातावरणात बदल झाल्याचं दिसत आहे. कोकण किनारपट्टीला हे चक्रीवादळ प्रत्यक्ष धडकलं नसलं, तरी किनारी भागात वेगवान वारे वाहात असल्याचं दिसून आलं. बिपरजॉय चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातल मान्सूनचं आगमनही जवळपास आठवड्याभरानं लांबलं. या पार्श्वभूमीवर आता मुंबई विमानतळावर प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर मनस्ताप सहन करावा लागत असल्याचं समोर आलं आहे. याचे काही व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. काही विमान कंपन्यांनी यासाठी प्रवाशांकडे दिलगिरीही व्यक्त केली आहे.

Cyclone Biparjoy चा फटका!
बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम म्हणून मुंबईतील वातावरणही बदललं आहे. वेगाने वारे वाहत आहेत. परिणामी मुंबई विमानतळावरच्या काही धावपट्ट्या सकाळच्या सुमारास उड्डाणासाठी बंद करण्यात आल्या. त्यामुळे अनेक विमान उड्डाणे उशीराने होत असल्याचं स्पष्ट झालं. यामुळे नियोजित ठिकाणी जाण्यासाठी विमानतळावर आलेल्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागवा. काही नेटिझन्सही या गोंधळाचे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर त्यावर चर्चा सुरू झाली.

विमानतळावर प्रवाशांकडून तक्रारी सुरू झाल्यानंतर एअर इंडियानं यासंदर्भात निवेदन जारी केलं. “हवामानातील बदल आणि विमानतळावरील ९/२७ धावपट्टी बंद तात्पुरता बंद करण्यात आला. शिवाय, आमच्या नियंत्रणात नसलेल्या इतर काही घटकांमुळे काही विमानांची उड्डाणे उशीराने होत असून काही उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. यासाठी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. तसेच, लवकरात लवकर यावर उपाययोजना करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत”, असं एअर इंडियानं आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

इंडिगो कंपनीनंही एका प्रवाशाच्या ट्वीटवर प्रतिक्रिया देताना “आमच्यासाठीही विमान उड्डाणं उशीरानं होणं तापदायक ठरलं आहे. आमच्या नियंत्रणात नसणाऱ्या गोष्टींमुळेच आम्हाला वेळापत्रकात बदल करावे लागत आहेत”, असं निवेदन दिलं आहे.

About विश्व भारत

Check Also

बांग्लादेशी घुसपैठियों को देश सें निकालने का आदेश: सुप्रीम कोर्ट की महत्वपूर्ण टिप्पणी?

बांग्लादेशी घुसपैठियों को देश सें निकालने का आदेश: सुप्रीम कोर्ट की महत्वपूर्ण टिप्पणी? टेकचंद्र सनोडिया …

उद्योग जगत के मशहूर उद्योगपति रतन टाटा का 86 वर्ष की उम्र में निधन

उद्योग जगत के मशहूर उद्योगपति रतन टाटा का 86 वर्ष की उम्र में निधन   …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *