Breaking News

तुम्ही कसे व्हाल तलाठी? वाचा…साडेचार हजार जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध

प्रलंबित महसूल विभागातील बहुप्रतीक्षित तलाठी भरतीला अखेर मुहूर्त सापडला आहे. ४ हजार ६४४ तलाठी पदांच्या भरतीसाठी महसूल विभागाने जाहिरात काढली आहे.

या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार असून त्याची मुदत २६ जून ते १७ जुलै २०२३ आहे. यापूर्वी राज्य सरकारने वारंवार तलाठ्यांची रिक्त पदे भरण्याची घोषणा केली होती. मात्र या भरतीला मुहूर्त मिळत नव्हता. भरती रखडल्याने भरतीची प्रतिक्षा करणाऱ्या उमेदवारांमध्ये तीव्र असंतोष होता. मात्र आता भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.

या भरतीसाठीची राज्यातील ३६ जिल्ह्याच्या केंद्रावर ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. ऑनलाईन परीक्षेसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना १००० रुपये तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ९०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. संगणकावर होणारी ही परीक्षा एकापेक्षा जास्त सत्रात आयोजित केली जाईल. प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका स्वतंत्रपणे उपलब्ध केल्या जातील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

About विश्व भारत

Check Also

सबको शिक्षा ही हमारा विकास मंत्र! मुख्यमंत्री डॉ. यादव के उदगार

सबको शिक्षा ही हमारा विकास मंत्र! मुख्यमंत्री डॉ. यादव के उदगार   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

महावितरण कंपनीत जंबो भरती : पात्रता काय?

प्रत्येक बेरोजगार युवकास नौकरी मिळण्याचे स्वप्न असते. त्यातही सरकारी नौकरी मिळत असेल तर त्यासाठी उड्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *