वारकरी सांप्रदायासाठी दिवाळी इतकाच मोठा सण अर्थात आषाढी एकादशी आज आहे. मानाच्या पालखीसोबत पंढरपूरात दाखल लाखो वारकऱ्यांनी आज विठूरायाचे दर्शन घेतले. सकाळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापुजा पार पडली. असे अनेक भक्त आहेत ज्यांना काही कारणास्तव पंढरपूरात जाणे शक्य झाले नसेल. मात्र आजच्या दिवशी तुम्ही घरच्या घरी विठूरायाची पुजा करू शकता. जाणून घेऊया पुजेची पद्धत.
🪷सकाळी आंघोळ आटोपून देवाजवळ दिवा लावावा. अगरबत्ती धूप लावावे. त्यानंतर घरी विठ्ठलाची मुर्ती असल्यास ती ताम्हणात ठेवावी. विठ्ठलाची मुर्ती नसल्यास श्रीकृष्णाची मुर्ती घ्यावी.
🪷देवाला आधी शुद्ध पाण्याने स्नान घालावे, त्यानंतर पंचांमृताने स्नान घालावे. परत शुद्ध पाण्याने स्नान घालावे. स्वस्छ कापडाने पुसून देवाला वस्त्र घालावे व देव घरात ठेवावे.
🪷देवाला अष्टगंध लावावे, बुक्का लावावा. पिवळे फुलं आणि तुळस वाहावी. एकादशीच्या दिवशी देवाला उपवास असतो असे म्हणतात, त्यामुळे देवाला उपवासाच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवावा.
🪷देवाची आरती करावी आणि सुख समृध्दीसाठी प्रार्थना करावी. घरच्या मंडळींना प्रसादाचे वाटप करावे. शक्य झाल्यास जवळच्या विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी जावे.
🪷एकादशीच्या दिवशी पुर्णवेळ उपवास केला जातो. या दिवशी उपवास केल्याने अक्षय फळ प्राप्त होते. एकादशीच्या दिवशी ब्रह्मचार्याचे पालन करण्याचा सल्ला धर्म शास्त्रात देण्यात आलेला आहे.
(👉वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
विश्वभारत News Website