Breaking News

IAS अधिकारी संजीव जयस्वाल श्रीलंकेला जात असताना विमानतळावर रोखले

वरिष्ठ सनदी अधिकारी व म्हाडाचे विशेष कार्यकारी अधिकारी(IAS) संजीव जयस्वाल यांना आठवडाभरापूर्वी विमानतळावर अडवण्यात आले. ते श्रीलंकेला जात होते, असे समजले. करोना केंद्र गैरव्यवहाराप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने(ईडी) जारी केलेल्या लुक आऊट सर्कुलरच्या आधारावर त्यांना विमानतळावर अडवण्यात आले.

काय आहे प्रकरण?

१९९६ च्या तुकडीचे सनदी अधिकारी असलेले जयस्वाल सध्या म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. यापूर्वी जयस्वाल हे मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्त होते आणि त्यांनी कोविड सेंटरसंबंधी आरोग्य सेवा, कर्मचारी आणि उपकरणे यासाठी करारनामे देण्यासंबंधीच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी केल्यामुळे ईडी त्याबाबत माहिती घेण्यासाठी त्यांना बोलवले आहे. याप्रकरणी ईडीने १५ ठिकाणी छापे टाकले होते. त्यावेळी १५० कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या ५० स्थावर मालमत्तांची कागदपत्रे, १५ कोटी रुपयांच्या मुदत ठेवी आणि गुंतवणूक, सुमारे ६९ लाख रुपये रोख व दोन कोटी ४६ लाख रुपये किंमतीचे दागिने जप्त केल्याचे सूत्रांनी सांगितले. यावेळी सनदी अधिकारी जयस्वाल यांच्या वांद्रे (पूर्व) येथील निवासस्थानावर छापा टाकून १३ लाखांची रोकड जप्त केली. त्यासोबतच मालमत्तेची कागदपत्रेही जप्त करण्यात आली होती. ईडीने जयस्वाल यांची मढ आयलंडमधील अर्धा एकर जमीन आणि त्यांच्या इतर अनेक मालमत्तांचीही ओळख पटवली आहे. ती मालमत्ता वडिलोपार्जीत असल्याचे जयस्वाल यांच्याकडून यापूर्वी स्पष्ट करण्यात आले आहे. करोना सेंटर गैरव्यवहाराप्रकणी ते ईडीच्या कार्यालयातही चौकशीसाठी उपस्थित राहिले होते. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्या गुन्ह्याच्या आधारावर ईडी याप्रकरणी चौकशी करत आहे.

About विश्व भारत

Check Also

PWD जांच करेगी : IAS अधिकारी की फ‍िर बढ़ी टेंशन 

PWD जांच करेगी : IAS अधिकारी की फ‍िर बढ़ी टेंशन टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट …

निलंबनाची कारवाई टाळण्यासाठी अधिकाऱ्यांची मुंबईवारी

अर्थ राज्यमंत्री तथा गडचिरोलीचे सहपालकमंत्री आशीष जयस्वाल यांनी गडचिरोलीत औषध व वैद्यकीय साहित्य खरेदीत कोट्यवधींचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *