बेरोजगार अभियंत्यांची ‘पीडब्लूडी’ कार्यालयावर धडक

महाराष्ट्र इंजिनीअर असोसिएशनशी संलग्नीत सुशिक्षीत बेरोजगार अभियंता कंत्राटदार असोसिएशनच्या स्थानिक शाखेच्यावतीने आज, मंगळवार, 29 ऑगस्ट रोजी सार्वजनीक बांधकाम विभागाच्या अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथील कार्यकारी अभियंता कार्यालयावर धडक दिली.

निवेदन देऊन शासन निर्णयाप्रमाणे विविध विकास कामांपैकी 33 टक्के कामे सुशिक्षीत बेरोजगार अभियंता कंत्राटदारासाठी राखीव ठेवण्याची मागणी करण्यात आली. त्यासाठी एक स्वतंत्र कक्ष उपलब्ध करुन देण्याचा आग्रहसुद्धा यावेळी करण्यात आला. शासन निर्णयाप्रमाणे विविध विकास कामांची निविदा प्रक्रिया करत असताना व कामे वितरीत करताना 33 टक्के कामे सुशिक्षीत बेरोजगार अभियंत्यांना देण्याचे नमुद आहे. अचलपूर साबांवि कार्यालय अंतर्गत कोट्यवधी रुपयांची विकास कामे होत असताना गेल्‍या काही वर्षांपासून सुशिक्षीत बेरोजगार अभियंत्यांना 33 टक्के कामे दिली जात नाहीत.

कामांचे वाटप करताना शासन निर्णयाचा योगय तो अवलंब करावा. सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांच्या संघटनेसाठी साबावि कार्यालयात एक कक्ष उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी संघटनेचे तालुका समन्वयक विशाल खडसे, पियुष बिजागरे, मो. इमरान मो फैजल, प्रदीप खडसे, कार्तीक गौर, शुभम गोडबोले, सर्वेश कडु, निशीकांत खरड, शंतनु शेळके, अभिजीत देशमुख, हेमंत ढोरे, मयुर राऊत, अभिषेक शेळके, तुषार कळमकर, नितीन धुळे, प्रतीक गोखले, प्रशांत कळमकर, स्वप्नील नाडगे, फजीम अली, अमोल पाटील, अमित तट्टे, विवेक लष्करी, अक्षय मोरे, राज जयस्वाल, प्रतीक गवई आदी बेरोजगार उपस्थित होते.

About विश्व भारत

Check Also

निवडणुकीत नागपूर जिल्ह्यात कारवाई कधी? : पिंपरी-चिंचवडमध्ये ८० लाखांची रोकड जप्त

विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यापासून पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अवैधरीत्या वाहतूक करीत असलेली ७९ लाख ६६ हजाराची …

भाजपाच्या ४० नेत्यांची हकालपट्टी : जिल्हाधिकाऱ्यांनी बजावली ३५० कर्मचाऱ्यांना नोटीस

विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या तीनही पक्षांमध्ये सर्वाधिक बंडखोरी दिसून आली आहे. त्यातही भाजपामध्ये बंडखोरांची संख्या अधिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *