Breaking News

मराठा आरक्षण : तेली समाज उतरणार रस्त्यावर

Advertisements

मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या विरोधात तेली समाज आक्रमक झाला आहे. चंद्रपुरात निघणाऱ्या महामोर्चात तेली समाज मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन तेली समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी केले. या महामोर्चात चंद्रपूर जिल्ह्यातील ओबीसी मोठ्या संख्येने सहभाग होणार आहे. मराठा समाजाला कुणबी जातीच्या दाखला देण्याच्या निर्णय घेतल्यास अन्य समाजावर अन्याय होणार असा सूर आजच्या बैठकीत निघाला.

Advertisements

आज (रविवार) चंद्रपूर येथील स्व. खासदार बाळूभाऊ धानोरकर अभ्यासिकेत तेली समाजाची आढावा बैठक झाली. बैठकीत मोठ्या प्रमाणात तेली बांधवांची उपस्थिती होती. तेली समाजाचे नेते प्रा.सुर्यकांत खनके यांनी सांगितले की,मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये सुसूत्रता आणण्याचे निमित्त करून सरसकट मराठ्यांचे ओबीसीकरण करू नये. मराठा समाजाला कुणबी जातीचा दाखला देण्याचा निर्णय घेतल्यास कुणबी समाज ओबीसीमध्ये असल्यामुळे तेली समाजासह अन्य समाजावर देखील हा अन्याय होणार आहे. त्यामुळे तेली समाज रस्त्यावर उतरून सरकारचा विरोध करेल. प्राध्यापक डॉ. नामदेवराव वरभे, प्रा. प्रवीण पोटदुखे, डॉ. संजय बेले, विदर्भ तेली समाज महासंघ शहर अध्यक्ष गोपाल अमृतकर, विदर्भ तेली समाज महासंघ गोविल मेहरकुरे, माजी नगरसेवक आकाश साखरकर, ओमप्रकाश पोटदुखे, रवींद्र जुमडे, प्रा. पांडुरंग मोहरकर, भूपेश गोठे, नरेंद्र बुरांडे, डॉ. प्रसाद पोटदुखे, गणेश येरणे, यश बांगडे, अशोक रहाटे, चंद्रशेखर घटे, मनीष खनके, नितेश जुमडे, योगेश देवतळे, सचिन किरमे, गणेश तिघारे, पुरुषोत्तम मोगरे, अजय खनके, गोपीभाऊ खोब्रागडे, हरिदास नागपुरे, संजय कुकडे, सुनील बुटले, भूपेंद्र खनके, भरत कुंडले, संजय बिजवे, गणेश पोहाणे, विनोद निखाते, अक्षय किरमे, ॲड. मुरलीधरराव बावनकर, उमेश मोगरे, कैलास राहटे, ओमप्रकाश पोटदुखे, प्रा. पांडुरंग मोहरकर, महेश टीपले, मनीष तपासे, सुभाष निखाते यांची उपस्थिती होती.

Advertisements

बैठकीत 17 सप्टेंबरला निघणाऱ्या ओबीसी महामोर्चात संपूर्ण तेली समाज मोठ्या संख्येने सहभागी होईल, असा निर्णय तेली समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला. बैठकीत तेली समाजाच्या मागण्यांवर चर्चा करण्यात आली.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

गडचिरोलीतील आलापल्ली-सिरोंचा रोडच्या दूरवस्थेची याचिका हायकोर्टात

गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली ते सिरोंचा या १०० किलोमीटर रोडच्या दूरवस्थेवर दोन आठवड्यात उत्तर सादर करा, …

छिन्दवाडा मेडिकल महाविद्यालय व हॉर्टिकल्चर कॉलेज का कार्य पूरा करेंगे : संसद नकुलनाथ के उदगार

छिन्दवाडा मेडिकल महाविद्यालय व हॉर्टिकल्चर कॉलेज का कार्य पूरा करेंगे : संसद नकुलनाथ के उदगार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *