Breaking News

नागपूरजवळील कोंढाळीत बसला लागली आग : काय झालं?… वाचा

नागपूर-अमरावती मार्गांवरील कोंढाळी बसस्थानकाजवळ एस. टी. महामंडळाच्या बसला अचानक आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने वेळीच ड्रायव्हर आणि कंडक्टर यांनी आग विझवल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. एम. एच. 14, बीटी 5034 क्रमाकांची बस नागपूरच्या मध्यवर्ती बस स्थानकावरून सकाळी साडेपाच वाजता 16 प्रवासी घेऊन धुळ्याकडे ही बस निघाली होती.

कोंढाळी बसस्थानकावर साडेसात वाजता बस दाखल झाली होती. काही वेळातच बसच्या इंजीनमधून धूर निघायला सुरुवात झाली. आणि पाहाता पाहाता बसच्या इंजिनने पेट घेतला. ही गोष्ट चालकाच्या लक्षात येताच त्याने सर्व प्रवाशांना बसखाली उतरले आणि अग्निशमन यंत्राने आग विझवली. बसच्या चालक आणि वाहकाच्या समयसूचकतेमुळे मोठी दुर्घटना टळली.

यापूर्वी 31जून 2023 रोजी नागपूरहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या खासगी बसला बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला हाेता. खांबाला धडकून उजव्या बाजूच्या संरक्षक कठड्यावर आदळलेली बस आधी डावीकडे पलटी झाली, नंतर काही क्षणातच तिने पेट घेतला. या अपघातात बसमधील 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली होती.

हा अपघात हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील पिंपळखुटा भागात झाला होता. बसमध्ये एकूण 33 जण प्रवास करत होते. यापैकी 25 प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाला होता. तर चालकासह आठ जण बसच्या खिडकीच्या काचा फोडून बाहेर पडल्याने त्यांचा जीव वाचला होता

About विश्व भारत

Check Also

नागपुरातील बारूद कंपनीत स्‍फाेट : कामगारांचा जागीच मृत्‍यू

नागपूर (Nagpur)जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील डोरली पासून जवळच असलेल्या कोतवालबड्डी येथील एसबीएल नामक बारूद कंपनीमध्ये आज …

१२ भाविकांचा मृत्यू : मौनी अमावस्येला महाकुंभात चेंगराचेंगरी : शाही स्नान रद्द

महाकुंभ येथील संगम घाटावर बुधवारी पहाटे संगम येथे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाल्याने या पवित्र सोहळ्याला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *