Breaking News

नागपुरात ऐतिहासिक मस्कऱ्या पारंपरिक गणपतीची साेमवारी स्थापना : कुळाचारी गणपतीचे विसर्जन होऊन गेल्याने केली होती स्थापना

नागपुरात १७८७ मध्ये श्रीमंत राजे खंडोजी महाराज भोसले (उर्फ चिमणाबापू) यांनी मस्कऱ्या (हडपक्या) या उत्सवाचे आयोजन केले होते. या गणपतीचे उद्या रविवार १ ऑक्टोबर रोजी आगमन होणार असून २ ऑक्टोबर रोजी स्थापना करण्यात येणार आहे. यावर्षी या गणपतीला २३६ वर्ष पूर्ण होत आहे.

श्रीमंत राजे खंडोजी महाराज भोसले उपाख्य चिमणाबापू यांनी १७८७ मध्ये सुरू केलेल्या हाडपक्या म्हणजेच मस्कऱ्या गणपतीची परंपरा आजही सुरू आहे. सोमवारी या गणेशाची स्थापना होणार असल्याची माहिती राजवाड्याकडून देण्यात आली. या उत्सवाची कहाणी अशी की, समशेर बहादर चिमणाबापू बंगालच्या स्वारीवर होते. बंगालवर विजय मिळवून परत येत असताना घरच्या कुळाचारी गणपतीचे विसर्जन होऊन गेले होते. बंगालच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी म्हणून या मस्कऱ्या गणपतीची स्थापना करण्यात आली. यात विविध नकला, लावण्या, खडी गंमत सारखे कार्यक्रम आयोजित केले जात. कालांतराने लोकमान्य टिळकांनी भोसले महाराजांच्या या घरगुती गणेशोत्सवाला सार्वजनिक रूप दिले.

उत्सवाला २०० वर्षे पूर्ण झाली. तेव्हापासून श्रीमंत राजे मुधोजी महाराज भोसले यांनी उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करणे सुरू केले. यावर्षी उत्सवाला २३६ वर्ष पूर्ण होत आहे. काही वर्षांपर्यंत १८ हातांची २१ फूटांची मूर्ती स्थापन करण्यात येत होती. यावर्षीही १८ हातांची ५ फूटांची मूर्ती स्थापन करण्यात येणार आहे.

श्रीमंत राजे खंडोजी महाराजांनी पितृपक्षात मस्कऱ्या (हाडपक्या) गणपतीची सुरू केलेली ही परंपरा आजपर्यंत कायम आहे. श्रीमंत राजे मुधोजी महाराज भोसले हे महाराजा ऑफ नागपूर ट्रस्टच्या व्यवस्थापनात हा उत्सव मोठया प्रमाणात साजरा करतात. हा नवसाला पावणारा गणपती आहे. आजही भक्तांना प्रचिती येते, असा दावा राजवाड्याकडून करण्यात येतो.

गणपतीची आगमन मिरवणूक उद्या १ ऑक्टोबरला दुपारी ३.३० वाजता सी. पी अ‌ॅण्ड बेरार महाविद्यालय, तुळशीबाग येथून मार्गक्रमण करून गुजर वाडा, ज्युनियर भोसला पॅलेस, राजे प्रतापसिंह भोसले चौक, (सुतिका गृह), कोतवाली पोलीस स्टेशन चौक, नरसिंग टॉकिज चौक व सिनीयर भोसला पॅलेसमार्गे राजवाड्यात येईल. नागरिकांनी गणेशोत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन राजवाड्याने केले आहे.

About विश्व भारत

Check Also

नागपुरातील बारूद कंपनीत स्‍फाेट : कामगारांचा जागीच मृत्‍यू

नागपूर (Nagpur)जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील डोरली पासून जवळच असलेल्या कोतवालबड्डी येथील एसबीएल नामक बारूद कंपनीमध्ये आज …

१२ भाविकांचा मृत्यू : मौनी अमावस्येला महाकुंभात चेंगराचेंगरी : शाही स्नान रद्द

महाकुंभ येथील संगम घाटावर बुधवारी पहाटे संगम येथे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाल्याने या पवित्र सोहळ्याला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *