नागपूर डेंग्यूचे ८०० रुग्ण : नवरात्रोत्सवावरही डेंग्यूचे सावट!

नागपुरात डेंग्यू नियंत्रणात येताना दिसत नाही. बघता- बघता शहरातील रुग्णसंख्या ७७६ रुग्णांवर पोहोचली आहे. त्यामुळे नवरात्रोत्सवावरही डेंग्यूचे सावट असल्याचे चित्र आहे. भूखंड व इतरत्र पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणावर डास उत्पत्ती झाली. त्यातून शहरात डेंग्यूचा प्रकोप सुरू झाला. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सतत हा आजार नियंत्रणात असल्याचा दावा होत असला तरी शहरात डेंग्यूचे रुग्ण वाढतच आहेत. १ जानेवारी ते आजपर्यंत येथील डेंग्यूग्रस्तांची संख्या ७७६ रुग्णांवर पोहोचली आहे. ८०० च्या घरात ही संख्या असू शकते.शहरात आजपर्यंत वरील काळात ८ हजार ३०० संशयित रुग्णांचीही नोंद झाली आहे.

ऑक्टोबर महिन्यातील १३ दिवसांत शहरात १ हजार १०० संशयित रुग्ण आढळले असून त्यापैकी ७४ रुग्णांमध्ये डेंग्यूचे निदान झाले आहे. आताही रुग्ण आढळत असल्याने डेंग्यूचे सावट कायम असल्याचे चित्र आहे. परंतु आता डेंग्यू नियंत्रणात असून संशयितांचे नमुने तपासणीसाठी येणे कमी झाल्याचा दावा नागपूर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून केला जात आहे. नमुने नसल्याने शनिवारी प्रयोगशाळेत तपासणीच झाली नसल्याचेही महापालिकेकडून सांगण्यात आले.

About विश्व भारत

Check Also

नागपुरात वाढतेय थंडी : राजकीय पारा चढला

राज्यातील विदर्भ वगळता इतर भागात आजदेखील अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्याच्या अधिकांश भागात …

पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या बॅगा तपासल्या!

‘उद्धव ठाकरे यांच्याआधी माझी बॅग तपासल्या गेली. सर्वांच्याच बॅग तपासल्या जात आहेत. मात्र, काही लोकांना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *