ZP चे निवृत्त कार्यकारी अभियंता सुभाष गणोरकर मनमिळावू स्वभावाचे धनी : सेवानिवृत्त समारंभात अनेकांना अश्रू अनावर

नागपूर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुभाष गणोरकर हे अंत्यत मनमिळावू आणि लोकाभिमुख कार्य करणारे व्यक्ती आहेत, असे मत सर्व हितचिंतकांनी व्यक्त केले. सुभाष गणोरकर गुरुवारी सेवानिवृत्ती झाले. त्यानिमित्त कंत्राटदार संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. गणोरकर यांनी आपल्या कार्यकाळात विविध कामे केली. त्यांचा स्वभाव मनमिळावू होता. त्यांनी विदर्भातील विविध ठिकाणी कामे केली. त्यांनी अनेकांची होणारी कामे तातडीने करून दिली. सेवानिवृत्त सत्कार कार्यक्रमात गडचिरोली, चंद्रपूर येथून कर्मचारी उपस्थित झाले होते. अनेकांना अश्रू अनावर झाले.

जिल्हा परिषद कार्यकारी अभियंता म्हणून कल्पना इखार यांनी पदभार स्वीकारला आहे. त्यांचे अखिल भारत हिंदू महासभाचे राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे, कंत्राटदार संघटनेचे कमलाशंकर पाठक, सतीश निकम,दीपेश कोलूरवार,दवंडे, संजय समरित, संदीप अवचट,संजय पाण्डेय,मनोज कनोजिया,निलेश कोल्हे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

About विश्व भारत

Check Also

२ सचिव दर्जाचे IAS अधिकारी निलंबित

केरळ सरकारने नुकतीच राज्यातील दोन आयएएस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली. शिस्तभंगाच्या मुद्द्यावरून ही कारवाई करण्यात …

वंचितचे उमेदवार भिमपुत्र विनय भांगे यांची घराणेशाही व जातीय राजकारणावर घणाघाती टीका

वंचितचे उमेदवार भिमपुत्र विनय भांगे यांची घराणेशाही व जातीय राजकारणावर घणाघाती टीका रामबाग, नागपूर, ९ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *