Breaking News

नागपुरात देशात रेकॉर्ड निर्माण करणारा रोजगार मेळावा

नागपूर : नमो महारोजगार मेळाव्यामध्ये दाखल झालेल्या एकूण मुलाखत दिलेल्या तरुणांपैकी ११ हजार ०९७ तरुणांना जॉब ऑफर लेटर देण्यात आली आहे. देशात रेकॉर्ड निर्माण करणारा हा रोजगार मेळावा ठरला, असे गौरवद्गार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. रोजगार मेळाव्याच्या समारोपीय कार्यक्रमात त्यांच्या हस्ते जॉब ऑफर लेटर सिंगल क्लिकच्या माध्यमातून तरुणांना पाठविण्यात आले.

यावेळी रोजगार, कौशल्य, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार प्रसाद लाड, आमदार प्रवीण दटके, भाजयुमोच्या नेत्या शिवानी दानी, निधी कामदार, माजी नगरसेवक संदीप गवई, माजी नगरसेवक बाल्या बोरकर, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालय मुंबईचे आयुक्त डॉ. रामास्वामी एन.(भा.प्र.से.), व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे विभागीय संचालक श्री. दिगंबर दळवी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

नागपूर येथे सुरू असलेल्या नमो महारोजगार मेळाव्यामध्ये दोन दिवसांमध्ये एकूण 67 हजार 378 तरुणांनी नोंदणी केली होती. यामध्ये एकूण 552 कंपन्यानी सहभाग घेतला. या दोन दिवसांमध्ये 38511 युवक सहभागी झाले होते. यापैकी 32831 तरुणांच्या मुलाखती पार पडल्या. या मुलाखतीनंतर सुमारे अकरा हजार 97 तरुणांना प्राथमिक स्वरूपात जॉब ऑफर लेटर देण्यात आलेत. संपूर्ण मेळाव्यात सहभागी झालेल्या सर्व कंपन्यांचे आभार मानण्यात आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात म्हणाले की, अतिशय यशस्वी असा हा मेळावा ठरला असून अनेक क्षेत्रातील प्रतिथयश कंपन्यांनी या मेळाव्यात सहभाग घेतला.
या मेळाव्याला मिळालेल्या भरगच्च प्रतिसादातून हे स्पष्ट झाले की, रोजगाराची कमतरता नाही, रोजगार देणाऱ्यांची कमतरता नाही कमी आहे ती या दोहोंना जोडणाऱ्या मंचाची…. जी कमी आज या मेळाव्याने पूर्ण केली. या मेळ्यात अनेक स्टार्टअपसनी सहभाग घेतला. महाराष्ट्र स्टार्टअपच्या बाबतीत क्रमांक १ वर आहे. उल्लेखनीय म्हणजे यात कृषी क्षेत्रातील स्टार्टअपची संख्या सर्वात जास्त आहे. आता सर्व नोकरी इच्छुक युवा यांची नाळ त्यांना अनुरूप रोजगार देणारे उद्योजक आणि कंपन्या यांच्याशी जोडणे यावर भर देणे आवश्यक आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

तत्पूर्वी कौशल्य विकास विभागाचे मंत्री यांनी रोजगार मेळाव्याचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल त्यांनी आयोजनासाठी पूर्वतयारी आणि मेहनत केलेल्या सर्वांचे अभिनंदन केले व आभार मानले. शिवानी ताई दानी यांची या महारोजगार मेळाव्याचे महाराष्ट्र समन्वयक म्हणून नेमणूक करण्याची शिफारस देखील त्यांनी उपमुख्यमंत्र्यांना केली.

मेळाव्यामध्ये रोजगार प्राप्त युवक युवतींना उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रमाणपत्रे देऊन गौरवण्यात आले. तसेच मेळाव्यात रोजगार उपलब्ध करून देण्यात महत्वाची भूमिका वठवणाऱ्या कंपन्या, उद्योजक आणि स्टार्टअपच्या प्रतिनिधींना देखील याप्रसंगी स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

या मेळाव्यात सहभागी झालेल्या तरुणांमध्ये मोठी उत्साही दिसून आली. या मेळाव्याच्या आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व अधिकारी, कर्मचारी आणि स्वयंसेवकांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन आभार व्यक्त करण्यात आले.

About विश्व भारत

Check Also

शाकाहारी थाळी ७०, मांसाहारी थाळी १२०, पोहे, शिरा, उपमा १५, तर चहा ८ रुपये : निवडणूक

निवडणूक आचारसंहितेत खाण्यावरही आयोगाची करडी नजर असणार आहे. शाकाहारी थाळी ७०, मांसाहारी थाळी १२०, पोहे, …

कामठी, गोंदिया, अकोला, चिखली, नागपूर, कणकवली, खामगाव, चिमूर, धामणगाव,चंद्रपूर, आर्वी मधील मतदार यादीत घोळ : काँग्रेसचा आरोप

शिर्डी, चंद्रपूर, आर्वी, कामठी, कोथरूड, गोंदिया, अकोला ईस्ट, चिखली, नागपूर, कणकवली, खामगाव, चिमूर, धामणगाव या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *