राज्यातील सर्व जिल्ह्यातील 7/12 साईट बंद आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात संताप दिसून येत आहे. 7/12 संकेतस्थळ आज सकाळी 9 वाजेपासून बंद आहे. रब्बी आणि खरीब पिकांची नोंदणी तसेच अन्य शासकीय कामासाठी 7/12,8-अ आणि फेरफार नोंद आवश्यक असते. पण, संकेतस्थळ बंद असल्याने शेतकऱ्यांचा हिरमोड झाला आहे.
