Breaking News

‘बिकिनी’तील फोटोची शर्मिला टागोरला का आठवण आली? वाचा

Advertisements

‘कॉफी विथ करण 8’ खूप चर्चेत आहे. या शोच्या ताज्या भागात अभिनेता सैफ अली खान आणि ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी हजेरी लावली. यादरम्यान या मायलेकाने त्यांच्या आयुष्याशी संबंधित अनेक मनोरंजक खुलासे केले. यावेळी शर्मिला टागोर यांच्या बिकिनी वादावरही प्रश्न विचारण्यात आला. त्यावर या दोघांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

Advertisements

करण शर्मिला टागोर यांना म्हणाला, “मी तुमच्या प्रसिद्ध बिकिनी फोटोशूटबद्दल बोलत आहे, जो ६० च्या दशकात फिल्मफेअरच्या कव्हरसाठी शूट केला गेला होता. त्यावेळी असे फोटोशूट करण्याचे धाडस कोणाचेच होत नव्हते. मी असं ऐकलंय की तुम्ही अशी पोज द्यावी अशी कोणाचीच इच्छा नव्हती. तुमचे फोटो काढताना फोटोग्राफरही खूप अस्वस्थ झाला होता का?” यावर सैफने त्याची आठवण सांगितली. “मला ते दिवस लक्षात आहेत. तेव्हा मी बोर्डिंग स्कूलमध्ये होतो आणि माझे मित्र मला आईचे फोटो दाखवून विचारायचे, ‘ही तुझी आई आहे का?’”

Advertisements

सैफ अली खानने १२ वर्षांनी मोठ्या अमृता सिंहशी गुपचूप केलेलं लग्न; आई शर्मिला टागोर यांना कळताच…

सैफ अली खानचं बोलून झाल्यानंतर त्याची आई आणि त्या काळातील लोकप्रिय अभिनेत्री शर्मिला टागोर म्हणाल्या, “ते फोटो काढताना फोटोग्राफर थोडे अस्वस्थ झाले होते. पण फोटोशूट दरम्यान मी चांगली दिसत आहे, इतकाच विचार मी करत होते. पण लोकांनी माझ्या त्या फोटोशूटचा चुकीचा अर्थ लावला होता याचं वाईट वाटतं.”

एका फोनमुळे लंडनहून यावं लागलं होतं परत
शर्मिला टागोर पुढे म्हणाल्या, “फक्त माझा फोटो पाहून लोकांनी ट्रोल केलं होतं. या फोटोशूटद्वारे मला लोकांचे लक्ष वेधून घ्यायचं होतं, असं लोकांना वाटत होतं. पण, मी या सगळ्याचा विचार केला नव्हता. मला वाटलं होतं की मी बिकिनीमध्ये छान दिसेन. जेव्हा माझा हा फोटो फिल्मफेअरमध्ये आला तेव्हा मी लंडनमध्ये शूटिंग करत होते. मला निर्माता शक्ती सामंता यांचा फोन आला होता आणि त्यांनी मला परत येण्यास सांगितलं होतं जेणेकरून मी लोकांशी या फोटोबाबत बोलू शकेल.”

बिकिनीमुळे संसदेत झालेल्या गदारोळाबद्दल शर्मिला म्हणतात…

जुन्या आठवणींना उजाळा देताना शर्मिला टागोर म्हणाल्या, “निर्माते शक्ती म्हणाले होते की जर मला लोकांमध्ये राहायचं असेल तर मी असं वागू शकत नाही (बिकिनीत फोटो काढू शकत नाही). तेव्हा त्यांच्या बोलण्याने मी नाराज झाले होते. मला त्या काळी ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. इतकंच नाही तर या फोटोबाबत संसदेतही प्रश्न विचारण्यात आले होते. मग माझा फोटो मी टायगरला (शर्मिलांचे पती टायगर पतौडी) टेलिग्रामद्वारे पाठवला आणि विचारलं की मी चांगली दिसत आहे का? यानंतर मी शांत झाले.” या घटनेनंतर मी लोकांसमोर कसं वागायला हवं, याची काळजी घेऊ लागले, असंही त्यांनी नमूद केलं.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

40 साल से अब तक लापता हैं बॉलीवुड के ये 4 स्टार्स : आज भी इंतजार में है परिवार

40 साल से अब तक लापता हैं बॉलीवुड के ये 4 स्टार्स : आज भी …

हेमा मालिनी की संपत्ति बढ़ी, 129 करोड़ की मालकिन, पास हैं इतने करोड़ के गहने है।

हेमा मालिनी की संपत्ति बढ़ी, 129 करोड़ की मालकिन, पास हैं इतने करोड़ के गहने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *