Breaking News

दोन वाघांमध्ये ‘फाईट’!दोघांचाही मृत्यू

देशातील प्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोळसा वनपरिक्षेत्रातील उपक्षेत्र झरी येथील कक्ष क्र. ३३८ मध्ये खातोडा तलाव परिसरात दोन वाघ मृतावस्थेत आढळून आल्याने वनविभागात खळबळ उडाली. अधिवास क्षेत्रासाठी झालेल्या झुंजीत या वाघांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

दोन्ही वाघांचे अवयव पूर्णपणे शाबूत आहेत. २० ते २१ जानेवारीदरम्यान झालेल्या झुंजीत या वाघांचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता वनविभागाने वर्तविली आहे. वाघाचे शवविच्छेदन केल्यानंतर दहन करण्यात आले. मृत्यूचे नेमके कारण कळावे, यासाठी विसेरा प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहे. यावेळी कोअरचे उपसंचालक नंदकिशोर काळे, वनपरिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव), रुदंन कातकर व बंडू धोतरे, एनटीसीएचे प्रतिनिधी, वैद्यकीय अधिकारी खोब्रागडे उपस्थित होते.

About विश्व भारत

Check Also

ताडोबातील वाघांच्या अभयारण्यावर हत्तीचे अतिक्रमण

ओरिसातून स्थलांतरित होणाऱ्या रानटी हत्तींनी महाराष्ट्रातील वन खात्यासमोर आव्हान निर्माण केले आहे. याआधी साधारणत: चार …

आजपासून राज्यात मुसळधार पावसाची शक्यता

कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने राज्यभरात येत्या तीन ते चार दिवस वादळ वाऱ्यासह मुसळधार पावसाची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *