Breaking News

राज्यात ऍम्ब्युलन्सची संख्या वाढणार : नवजात शिशू रुग्णवाहिका सेवा

नागरिकांसाठी १०८ रुग्णवाहिका जीवनदायिनी ठरली आहे. या सेवेत नवजात बालकांसाठी विशेष रुग्णवाहिका व ‘बोट’ रुग्णवाहिकांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. सद्यस्थितीत १०८ सेवेद्वारे ९३७ रुग्णवाहिका राज्याच्या विविध भागात कार्यरत असून त्यात आणखी ८१९ रुग्णवाहिकांची वाढ केली जाणार आहे. १७५६ रुग्णवाहिका राज्याच्या विविध भागात सेवा देणार आहेत.

गेल्या १० वर्षात राज्यातील असंख्य रुग्णांना १०८ रुग्णवाहिकेचा लाभ झाला. अनेक नवजात बालकांचा जन्म देखील रुग्णवाहिकेत झाला. समुद्र, व नद्यांमध्ये बुडून मृत्युमुखी पडणाऱ्या नागरिकांची वाढती संख्या लक्षात घेता नव्याने ३६ ‘बोट’ रुग्णवाहिका विविध अपघाती समुद्र किनारे व नदी पात्रांमध्ये तैनात होणार आहेत. त्याचबरोबर नवजात शिशूंसाठी २५ रुग्णवाहिका नव्याने येणार आहेत. दहा वर्षांपूर्वी १०८ रुग्णवाहिका सुरू करण्यासाठी निविदा काढण्यात आली होती. त्याचा सर्व भांडवली खर्च शासनाच्यावतीने करण्यात आला होता. नवीन निविदेनुसार ५१ टक्के भांडवली खर्च सेवा पुरवठा करणाऱ्या संस्थेला करावा लागेल. त्यामुळे सदर निविदा १० वर्षांसाठी काढण्यात आली आहे. रुग्णवाहिकांसाठी सद्यस्थितीत प्रतिमहिना ३३ कोटी रुपये शासनाला खर्च करावे लागतात. रुग्णवाहिकेच्या वाढत्या संख्येमुळे प्रती महिना ६३ कोटी रुपये शासनाला खर्च करावे लागतील. एकंदरीतच अतिरिक्त ३० कोटी प्रती महिना शासनाला खर्च करावा लागणार आहे. रुग्णवाहिकेची संख्या वाढल्याने १०८ क्रमांकावर संपर्क साधल्यावर रुग्णवाहिकेचा प्रतिसाद देण्याची वेळ कमी होईल.

अशी आहे रुग्णवाहिकांची संख्या

सध्या १०८ रुग्णवाहिकेच्या सेवेमध्ये २३३ ‘ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट’, ७०४ ‘बेसिक लाईफ सपोर्ट’, ३३ दुचाकी रुग्णवाहिका कार्यरत आहेत. नव्यामध्ये २२ ‘ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट’, ५७० ‘बेसिक लाईफ सपोर्ट’, दुचाकी रुग्णवाहिका १६३, २५ नवजात शिशुंसाठी रुग्णवाहिका आणि ३६ ‘बोट’ रुग्णवाहिका वाढणार आहेत.

About विश्व भारत

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या जवळच्या आमदाराला राजकारण कळत नाही

महाराष्ट्र : मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे म्हणून ओळखले जाणारे विधान परिषद सदस्य परिणय फुके …

देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्रीपद धोक्यात : न्यायालयाकडून लवकरच निर्णय

भाजपचे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेले भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. त्यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *