Breaking News

नागपूरसह पूर्व विदर्भात ‘डेंग्यू’च्या रुग्णांत वाढ!

Advertisements

पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये २०२२ या वर्षीच्या तुलनेत २०२३ मध्ये तब्बल चारपट डेंग्यूचे रुग्ण वाढल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीतून पुढे आले आहे. सर्वाधिक रुग्ण हे नागपूर महापालिका हद्दीतील आहेत, हे विशेष.

Advertisements

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पुणे कार्यालयाच्या नोंदीनुसार पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये २०२२ मध्ये डेंग्यूचे ५ हजार ५२७ संशयित रुग्ण आढळले. त्यापैकी ५५२ रुग्णांना डेंग्यू असल्याचे वैद्यकीय तपासणीतून स्पष्ट झाले. तर २०२३ मध्ये येथे २३ हजार ७४४ संशयित रुग्णांची नोंद झाली. पैकी तब्बल २ हजार ३६५ रुग्णांमध्ये डेंग्यूचे निदान झाले. त्यामुळे २०२२ च्या तुलनेत वर्ष २०२३ मध्ये डेंग्यूग्रस्तांची संख्या चारपट वाढली. त्यापैकी सर्वाधिक ८६५ रुग्ण हे नागपूर महापालिका हद्दीत आढळले. तर नागपूर ग्रामीणमध्येही ४३९ रुग्णांची नोंद झाली.

Advertisements

डेंग्यूची स्थिती
जिल्हा/ शहर २०२२ २०२३
भंडारा ०१९ ०२९
गोंदिया १७५ २०८
चंद्रपूर १०० ३८०
गडचिरोली ०७७ २३३
नागपूर (श.) ११८ ८६५
नागपूर (ग्रा.) ०४० ४३९
वर्धा ०२३ २११
एकूण ५५२ २,३६५

Advertisements

About विश्व भारत

Check Also

नागपूर जिल्ह्यात वीज पडून दोघांचा मृत्यू

नागपूर जिल्ह्यातील काटोल, कोढाळी भागात रविवारी दुपारी दीड वाजताच्या दरम्यान विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाला. …

नागपुरात आज व उद्या पावसाचा अंदाज

राज्यासह उन्ह पावसाचा खेळ सुरु आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *