Breaking News

कन्नडच्या पुरवठा विभागाचा अनागोंदी कारभार : शिधापत्रिकेत गंभीर चुका

छत्रपती संभाजीनगर : कन्नडच्या पुरवठा विभागाकडून शिधापत्रिका आणि आधार जोडणीमध्ये गंभीर चुका झाल्याचे दिसून येत आहे. विशेष करून केंद्र सरकारची आरोग्यासाठी विशेष योजना प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत आयुष्यमान भारत कार्ड व राज्य सरकारचे महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेची कोणतीही सवलत या कार्डधारकांना मिळत नसल्याचे दिसून येत आहे. विविध सरकारी योजना आणि लाभांपासू वंचित राहावे लागत आहे. या अनागोंदी कारभाराचा फटका कन्नडमधील सर्वसामान्य कार्डधारकांना बसत आहे.

 

पुरवठा विभागाने केलेल्या आधार कार्डजोडणीत कन्नड शहर; तसेच तालुक्यातील अनेक शिधापत्रिका लाभधारकांच्या शिधापत्रकाला आधार कार्डची जोडणी करताना गंभीर चुका केल्या आहेत. कन्नडमधील शिधापत्रिकांना गुजरात, मुंबई, कोलकाता येथील आधार कार्डधारकांशी जोडले आहे.

 

वेगळ्याच अडचणींचा सामोरे जावे लागत असून, विविध लाभांपासून कार्डधारक वंचित राहत आहे. विशेष करून केंद्र सरकारची आरोग्यासाठी विशेष योजना प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत आयुष्यमान भारत कार्डची व राज्य सरकारचे महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेची कोणतीही सवलत मिळत नसल्याचे दिसून येत आहे.

About विश्व भारत

Check Also

आमदाराने तहसीलदार, कृषी अधिकाऱ्यांना कोंडले

पीक विम्याचा प्रश्न पेटला असून यावर बाळापूरचे ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी आज अधिकाऱ्यांची …

हम जिंदा हैं तब तक कोई भी बारामती में? विपक्ष पर जमकर बरसे DCM अजित पवार

हम जिंदा हैं तब तक कोई भी बारामती में? विपक्ष पर जमकर बरसे DCM अजित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *