एका वृत्तवाहिनीने केलेल्या सर्वेनुसार लोकसभा निवडणुकीत धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता आहे. कोण बाजी मारणार? हे बघूया…!
महायुतीला ३० जागांवर यश मिळेल असा अंदाज
बुलडाण्यातून महाविकास आघाडीचे नरेंद्र खेडकर हे महायुतीच्या प्रतापराव जाधवांना पिछाडीवर टाकतील अशी शक्यता आहे. अकोल्यातून महायुतीचे अनुप धोत्रे हे महाविकास आघाडीच्या अभय पाटील यांना हरवतील असा अंदाज आहे. अमरावतीतून महायुतीच्या नवनीत राणा या महाविकास आघाडीच्या बळवंत वानखेडेंना पिछाडीवर टाकतील असा अंदाज आहे. वर्ध्यातून रामदास तडस हे महाविकास आघाडीच्या अमर काळेंना पिछाडीवर सोडतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मविआला १८ जागा मिळतील असा अंदाज
रामटेकमधून महायुतीचे राजू पारवे हे महाविकास आघाडीच्या रश्मी बर्वेंना पिछाडीवर टाकतील, तर नागपूरमधून महायुतीचे नितीन गडकरी हे मविआच्या विकास ठाकरेंना मागे टाकतील असा अंदाज या पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. चंद्रपूरमधून प्रतिभा धानरोकरांना सुधीर मुनगंटीवार मागे टाकतील असा अंदाज आहे. कल्याणमधून श्रीकांत शिंदे वैशाली दरेकरांना पिछाडीवर टाकतील असा अंदाज आहे. तर भिवंडीतून मविआचे सुरेश म्हात्रे कपिल पाटील यांना मागे टाकतील असा अंदाज आहे. बारामतीत सुप्रिया सुळे या सुनेत्रा पवारांना मागे टाकतील असा अंदाज आहे. तर शिरुरमधून शिवाजीराव आढळराव पाटील यांना अमोल कोल्हे मागे टाकतील असा अंदाज आहे. अहमदनगरमधून सुजय विखे पाटील यांना निलेश लंके मागे टाकतील असा अंदाज आहे. तर बीडमधून बजरंग सोनावणेंना पंकजा मुंडे मागे टाकतील असा अंदाज आहे. सांगलीतून संजयकाका पाटील हे मविआच्या चंद्रहार पाटील यांना मागे टाकतील असा अंदाज आहे.तर कोल्हापूरमधून संजय मंडलिक हे शाहू महाराज छत्रपतींना मागे टाकतील असा अंदाज आहे.
ओपिनियन पोलनुसार महायुतीला राज्यात ४८ पैकी ३० जागांवर यश मिळेल तर महाविकास आघाडीला १८ जागांवर समाधान मानावं लागेल असं चित्र आहे. लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा सुरु होण्यासाठी अवघे दोन ते तीन दिवस आहेत अशात हा अंदाज ४५ + चा नारा देणाऱ्या भाजपा आणि महायुतीचं टेन्शन वाढवणारा आहे यात शंका नाही.