1 ते 3 जून दरम्यान राज्यातील राजधानी मुंबई, अहमदनगर, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापुर, सोलापुर, लातुर, नांदेड या भागात पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते.
3 ते 5 जून पर्यंत राज्यातील मुंबई, नाशिक, पुणे, नगर, सातारा, सांगली, कोल्हापुर, सोलापूर, लातुर, बिड, परभणी, जालना, नांदेड, यवतमाळ, नागपूर, हिंगोली, वाशिम, अकोला, औरंगाबाद, धुळे, नंदुरबार, जळगाव, बुलढाणा पर्यंत पावसाची हजेरी लागणार असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
तसेच पूर्व-पश्चिम विदर्भ आणि खानदेशातील काही जिल्ह्यांमध्ये 7 जून पासून ते 11 जून पर्यंत पावसाची शक्यता असल्याचा अंदाज आहे.
मात्र एखादा पाऊस पडला की लगेच शेतकऱ्यांनी पेरणी करू नये असे आवाहन त्यांनी केले आहे. किमान एक ईतभर ओल गेल्यानंतरच पेरणी करावी असे त्यांनी म्हटले आहे. 8 जूनला महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होणार आहे.