Breaking News

तहसीलदार, कोतवाल लाच घेताना सापडले : आणखी किती महसूल अधिकारी रडारवर? वाचा

रास्त दुकानदारावर कारवाई व परवानाही रद्द न करण्यासाठी केज तहसील कार्यालयातील तहसीलदार व कोतवाल २० हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी धाराशिव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळयात अडकले. अभिजीत लक्ष्मण जगताप व मच्छिंद्र मारोती माने, अशी लाच मागणाऱ्यांची नावे असून दोघे केज तहसील कार्यालयात अनुक्रमे तहसीलदार व कोतवाल पदी आहेत. तक्रारदाराकडून ४० हजार रुपयांची मागणी करून २० हजार स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकले.

 

या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील तक्रारदार यांचे रास्तभाव धान्य दुकान असून, त्यांचे रास्त भाव धान्य दुकानामध्ये शासनाकडून मिळालेला धान्यसाठा व तक्रारदार यांनी ग्राहकांना वाटप केलेले धान्य यामध्ये तफावत असल्याचे सांगून तक्रारदार यांचेवर कारवाई न करण्याकरीता तसेच त्यांचा रास्त भाव धान्य दुकानाचा परवाना रद्द न करण्याकरीता तहसिलदार अभिजीत जगताप याने कोतवाल मच्छिंद्र माने याचे मार्फतीने तक्रारदार यांचेकडे पंच साक्षीदार यांच्यासमक्ष ४० हजार रुपये लाच मागणी करुन प्रोत्साहन दिले. तसेच माने याने तडजोडी अंती २० हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य करुन पंच साक्षीदारा समक्ष तक्रारदार यांचेकडुन लाच रक्कम स्वीकारले. मच्छिंद्र माने यास ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सिद्धराम म्हेत्रे व त्यांच्या सापळा पथकातील पोलीस अमलदार दिनकर उगलमुगले, मधुकर जाधव, सचिन शेवाळे नागेश शेरकर, चालक दत्तात्रय करडे यांनी केली. येत्या काही दिवसात आणखी सापडे वाढणार असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे विदर्भ आणि मराठवाड्यात महसूल अधिकारी रडारवर असल्याचं बोललं जात आहे.

About विश्व भारत

Check Also

पुलिस ने रेप पीड़िता को 15 दिन घुमाया : SP से शिकायत होते मचा हड़कंप

पुलिस ने रेप पीड़िता को 15 दिन घुमाया : SP से शिकायत होते मचा हड़कंप …

२४ उपजिल्हाधिकाऱ्यांना नियमबाह्य बढती : मुख्य सचिवांकडे तक्रार

२४ उपजिल्हाधिकाऱ्यांना भारतीय प्रशासन सेवेत बढती देण्याचा प्रस्ताव दाखल करताना नियम डावलले असल्याची तक्रार महाराष्ट्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *