Breaking News

भाजपसाठी ४०० अवघड : काँग्रेसला मिळेल बहुमत?

Advertisements

लोकसभा निवडणुकीचा सातवा आणि शेवटचा टप्पा पार पडला आहे. आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे ते ४ जुनच्या निवडणूक निकालाकडे. मात्र आज निवडणूक संपल्यानंतर म्हणजेच सातवा टप्पा पार पडल्यानंतर एक्झिट पोलचे अंदाज समोर येत आहेत. यामध्ये पुन्हा एकदा मोदी सरकारच देशात येईल हे जवळपास प्रत्येकच एक्झिट पोलने म्हटलं आहे. मात्र अशात भाजपासह एनडीएचं ४०० पारचं स्वप्न पूर्ण होणं हे अवघड दिसतं आहे असं हे अंदाज सांगत आहेत. एकाही एक्झिट पोलने भाजपासह एनडीए ४०० पार जाईल असं म्हटलेलं नाही. कुठला सर्व्हे काय सांगतो आहे? हे आम्ही तुम्हाला आता सांगणार आहोत.

Advertisements

रिपब्लिक भारत-मैट्रीजच्या सर्व्हेने काय अंदाज वर्तवलाय?

Advertisements

एनडीए – ३५३ ते ३६८ जागाइंडिया आघाडी – ११८ ते १३३ जागाइतर- ४३ ते ४८ जागा

रिपब्लिक PMARQ चा अंदाज काय?

एनडीए – ३५९ जागा इंडिया आघाडी – १५४ जागा इतर- ३० जागा

जन की बातच्या एक्झिट पोलचा अंदाज काय?

एनडीए- ३६२ ते ३९२ जागाइंडिया आघाडी- १४१ ते १६१ जागाइतर- १० ते २० जागा

इंडिया न्यूज डी डायनामिक्सचा अंदाज काय सांगतो?

एनडीए -३७१ जागाइंडिया आघाडी- १२५ जागाइतर – ४७ जागा

एबीपी सी व्होटर्सच्या सर्व्हेचा अंदाज जागा काय?

एनडीए-३५३ ते ३८३ जागाइंडिया आघाडी- १५२ ते १८२ जागाइतर – ४ ते १२ जागा

चाणक्यचा सर्व्हे काय सांगतो आहे?

एनडीए ४०० ते ४१५ जागाइंडिया आघाडी- १०७ ते १११ जागाइतर ३६ जागा

वरील सगळे अंदाज पाहिले तर चाणक्य वगळता सगळ्यांनीच एनडीएला ३५० जागा आणि त्यापेक्षा अधिक जागा दिल्या आहेत हे दिसून येतं आहे. ५४३ जागांसाठी मतदान पार पडलं आहे. लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी २७३ ही मॅजिक फिगर आहे. अशात इंडिया आघाडी विरुद्ध एनडीए अशी थेट लढत होती. इंडिया आघाडीने पंतप्रधानपदाचा चेहरा जाहीर केला नाही. तर नरेंद्र मोदींना प्रोजेक्ट करतच एनडीएने ही निवडणूक लढवली. अशात ३५० किंवा त्यापेक्षा अधिक जागा मिळतील असे अंदाज वर्तवण्यात येत आहेत. मात्र ४०० पार जागा जाणार नाहीत हे देखील स्पष्ट होतं आहे. त्यामुळे भाजपासह एनडीएचं ४०० पारचं स्वप्न भंग होईल असं हे पाच पोल सांगत आहेत.

एक्झिट पोल्स काय सांगत आहेत?

१९८९ नंतर देशाने स्थिर सरकार पाहिलं नव्हतं. मात्र २०१४ ला देशाला एका पक्षाला पूर्ण बहुमत मिळालं आणि आम्ही सत्तेवर आलो. आता तिसऱ्यांदाही नरेंद्र मोदीच पंतप्रधान पदी विराजमान होतील असं वक्तव्य भाजपाचे प्रवक्ते अतुल भातखळकर यांनी व्यक्त केलं आहे. भाजपाने ४०० पारचा नारा दिला आहे. तसंच एकटा भाजपा हा पक्ष ३७० जागा जिंकण्याचा दावा करतो आहे. मात्र एक्झिट पोलचे हे अंदाज पाहिले तर ४०० पारचं स्वप्न हे काही पूर्ण होताना दिसत नाहीये हेच हे अंदाज सांगत आहेत. आता ४ जून रोजी नेमकं चित्र स्पष्ट होणार आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

कांग्रेस के वरिष्ठ नेता पूर्व सांसद दत्ता भाऊ मेघे का निधन

कांग्रेस के वरिष्ठ नेता पूर्व सांसद दत्ता भाऊ मेघे का निधन   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

Former MP Datta Meghe Dies at 89 After Cardiac Arrest

Former MP Datta Meghe Dies at 89 After Cardiac Arrest Nagpur, March 22, 2026: Datta …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *