Breaking News

शरद पवार शाकाहारी की मांसाहारी?

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी जैन समाजाच्या जैन मुंनीचे काल (११ जून) दर्शन घेतले. मध्य प्रदेशातून बारामतीत आलेल्या महाराजांचे दर्शन घेताना शरद पवारांबरोबर युगेद्र पवारही उपस्थित होते. यावेळी जैन मुनींनी शरद पवारांना शाकाहाराबद्दल त्यांचं मत विचारलं.

 

बारामतीच्या महावीर भवन येथे विशालजी सागर, धवलसागरजी आणि उत्कृष्ट सागर महाराजांचे शरद पवारांनी दर्शन घेतले. यावेळी या मुनींनी महाराजांना शाकाराबद्दल त्यांचं मत विचारलं. त्यावर शरद पवार म्हणारे, आजकाल मी शंभर टक्के शाकाहारी आहे. याआधी मी शाकाहारी नव्हतो. परंतु, एक वर्षांपासून मी पूर्णतः शाकाहारी आहे.

 

शरद पवार पुढे म्हणाले की, आज आनंदाचा दिवस आहे. दुष्काळी दौऱ्यासाठी मी निघतो तेव्हाच पावसाला सुरुवात होते, असा माझा अनुभव आहे. हे पावसासाठी चांगलं वर्ष आहे. त्याचे परिणाम आपल्याला बघायला मिळतील.

 

बारामतीच्या महावीर भवन येथे व्यापाऱ्यांचा मेळावा होणार आहे. त्याआधीच तेथे जैन मुनींनी शरद पवारांना भेट दिली. यावेळी शरद पवारांनी त्यांच्याशी जैन धर्माविषयी चर्चा केली. शरद पवारांच्या गळ्यात स्वागताचा हार घातला. तेव्हाच पावसालाही सुरुवात झाली.

 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापनादिनी काय म्हणाले शरद पवार?

 

“तुम्ही चांगले लोक निवडून दिले, इथे आठ जणांचा परिचय तुम्हाला करून दिला यातील प्रत्येक व्यक्ती ही लोकांच्या सुखदुःखाशी संबंध ठेवणार आहे. मी तुम्हाला खात्री देतो या पक्षाचा नेता म्हणून की आमचे सगळे खासदार दिल्लीमध्ये जातील, तुमच्या प्रश्नांसाठी सतत जागरूक राहतील. नवीन काही लोक आहेत, त्यांना जे काही मार्गदर्शन हवे असेल, तर त्या ठिकाणी मी सुद्धा काही दिवस आहे”, असं शरद पवार म्हणाले.

 

“मलाही आता यंदाच्या वर्षी पार्लमेंट आणि विधानसभा इथे जाऊन ५६ वर्ष पूर्ण होत आहेत, आणखी किती वर्ष राहायचं? ५६ वर्ष एकाही दिवसाची सुट्टी नाही, असं काम महाराष्ट्राच्या जनतेने माझ्यावर सोपवलं. त्यामुळे मला जे काही या संबंधित ज्ञान असेल, ते या आठही जणांच्या मागे कायमच राहील आणि त्यांच्यामार्फत आज त्या ठिकाणी काम करून घेतले जाईल. सुदैवाने सुप्रिया आणि कोल्हे साहेब हे दोन्ही अनुभवी सदस्य आहेत. सुप्रियाची चौथी टर्म आहे, कोल्हे साहेबांची दुसरी टर्म आहे आणि संसदपटू म्हणून संसद सन्मान हा या दोघांनाही मिळालेला आहे. त्या दोघांचीही मदत या नवीन सदस्यांना होईल आणि त्यांच्यामार्फत तुमच्या जिल्ह्याचे, तुमच्या मतदारसंघाचे, तुमच्या राज्याचे जे काही महत्त्वाचे प्रश्न असतील, ते प्रभावीपणाने आज त्या ठिकाणी मांडले जातील. हे आठही लोक माझ्या दृष्टीने छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ होतं, तसं हे महाराष्ट्राच्या जनतेचे अष्टप्रधान महाराष्ट्राच्या हिताची जपणूक करतील, याची खात्री मी देतो”, असाही विश्वास त्यांनी दिला,

About विश्व भारत

Check Also

कांग्रेस के पूर्व केंद्रीय मंत्री व पूर्व CM कमल नाथ का राजनैतिक गढ ध्वस्त!

कांग्रेस के पूर्व केंद्रीय मंत्री व पूर्व CM कमल नाथ का राजनैतिक गढ ध्वस्त! टेकचंद्र …

BJP लोकसभा में हुई गलती विधानसभा में नहीं दोहराएगी

BJP लोकसभा में हुई गलती विधानसभा में नहीं दोहराएगी टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट मुंबई …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *